5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, 18 जिल्ह्यातून लॉकडाऊन उठवला, तुमचा जिल्ह्यातील लॉकडाऊन कधी उठणार?

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. तसंच मुंबई लोकलबातच्या निर्णयात तूर्तास कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, 18 जिल्ह्यातून लॉकडाऊन उठवला, तुमचा जिल्ह्यातील लॉकडाऊन कधी उठणार?
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 5:17 PM

मुंबई :  कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं चित्र आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही घट होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई लॉकडाऊन शिथील होणार नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. तसंच मुंबई लोकलबातच्या निर्णयात तूर्तास कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (lockdown in maharashtra will be removed in 5 phases)

विजय वड्डेटीवार नेमकं काय म्हणाले?

रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे, ई कॉमर्स सुरू राहिल. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार, बस 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यात येतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील. आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असेल

पहिल्या लेवलमधील जिल्हे

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे , वर्धा, वाशिम, यवतमाळ

दुसऱ्या लेव्हलमधील जिल्हे

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार,

तिसऱ्या लेव्हलमधील जिल्हे

अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर

चौथ्या लेव्हलमधील जिल्हे

पुणे, रायगड

मुंबई दुसऱ्या लेव्हलमध्ये

मुंबई दुस-या लेव्हलमध्ये आहे. त्यामुळे या आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहे. ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिलीय. तसंच प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट बघून जिल्ह्याचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पाच लेव्हल कशा आहेत?

पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर

पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात 5 टप्प्यात शिथीलता देणार

मुंबईत कोरोना आटोक्यात, आसपासच्या महापालिकेतही मुंबई मॉडेल राबवा, हायकोर्टाचे आदेश

lockdown in maharashtra will be removed in 5 phases

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.