मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत असल्यामुळे राज्यात अनलॉकिंगच्या दिशेनं एक-एक पाऊल टाकण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांची विभागणी 5 लेव्हलमध्ये करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील, असंही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांच्या पत्रकार परिषदेनंतर आता राज्य सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यात राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताप अजून विचाराधीन असल्याची माहिती देण्यात आलीय. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन तुर्तास कायम असल्याचंच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (lockdown in the state is still going on, the proposal of new rules is still under consideration)
कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. यापुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत आहेत. यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असं राज्य सरकारने सांगितलं आहे.
राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. #BreakTheChain अंतर्गत काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. pic.twitter.com/ZiXbhlMgAK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 3, 2021
अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे, ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असंही राज्य सरकारने आपल्या निवदेनात म्हटलंय.
लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील, असं वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे
दुसर्या टप्प्यात 5 जिल्हे
तिसरा 10 जिल्हे
चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर,धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव, जालना लातूर नागरपूर नांदेड नाशिक परभणी,ठाणे ,वर्धा. वाशिम .यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे.
मुंबईत आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहेत. ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल
अनलॉकचा निर्णय उद्यापासून अंमलात आणला जाणार आहे. दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट बघून जिल्ह्याचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
संबंधित बातम्या :
lockdown in the state is still going on, the proposal of new rules is still under consideration