काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घशाला संसर्ग झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांन संसर्गाचा त्रास जाणवत होता. त्यांना आरोग्याची तक्रार जाणवली होती. पण तरीही त्यांनी याकाळात प्रचाराची जबाबादारी सांभाळली. दरम्यान दरे या गावातून ते ठाण्यात दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी अनेक नेत्यांना भेट नाकारली होती. तर आज ज्युपिटर रुगालयात उपचारासाठी आले. आरोग्य तपासणीसाठी ते आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या घशाला संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तर या सर्व घडामोडीत ते नाराज असल्याची पण चर्चा रंगली आहे. दरम्यान महायुतीचे सरकार स्थापन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वीच शिंदे गटाचे शिलेदारांचे याविषयीचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. संजय शिरसाट यांनी याविषयावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले शिरसाट?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात पोहचले. तर त्याचवेळी आझाद मैदानावर शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहेत. प्रकृतीची तक्रार असेल तर महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात शिंदे दिसतील का? असे त्यांना विचारण्यात आले असता, याविषयी डॉक्टर माहिती देतील असे त्यांनी सांगीतले. त्यामुळे जर प्रकृतीचे कारण पुढे करून शिंदे गट दबाव तयार करत तर नाही ना? अशी चर्चा पण सुरू आहे. अर्थातच उद्याच एक दिवस बाकी असताना खाते वाटप, मंत्री पदे यावरील तिढा सुटला नसल्याचे समोर येत आहे.
भाजपानं गृहखातं आम्हाला द्यावं
दरम्यान संजय शिरसाट यांनी राज्याचं गृहखातं आम्हाला द्यावं, अशी मागणी केली आहे. राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण खाते वाटपावरून अजूनही नाराजी असल्याचे दिसून आले आहे. तर गिरीश महाजन प्रकृतीची चौकशीसाठी गेले होते. संकटमोचन गेले आणि तिढा सुटला असं काही घडलं नाही, असे शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगीतले. गृहमंत्री पद, गृहराज्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गट आणि भाजपात यावरून ताणाताणी सुरू असल्याचे दिसते. तर आमचा स्ट्राईक रेट उत्तम असताना आम्हाला ही अधिक मंत्रीपद मिळायला हवीत अशी मागणी राष्ट्रवादी गट करत असल्याने महायुतीमध्ये चाललंय तरी काय? असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.
आता तब्येत उत्तम
दरम्यान एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमधून नुकतेच बाहेर पडले. त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. चेकअपसाठी आलो होतो, आता तब्येत उत्तम आहे असे त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडताना सांगीतले. ते आता वर्षा या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण शपथविधीपूर्वीच अनेक नाट्यमय घडामोडींमुळे विरोधकांना टीका करण्यासाठी आयतेच मुद्दे मिळत असल्याचे चित्र आहे.