मंत्रालयात सचिवांची कुरबूर वाढली, मुख्य सचिवांच्या नियुक्ती आदेशावर उपसचिवांची सही

संजय कुमार यांच्या नियुक्तीच्या आदेशावर अतिरिक्त सचिवांची म्हणजे सीताराम कुंटे यांची सही अपेक्षित होती, . (Maharashtra Mantralay secretary conflicts )

मंत्रालयात सचिवांची कुरबूर वाढली, मुख्य सचिवांच्या नियुक्ती आदेशावर उपसचिवांची सही
Follow us
| Updated on: Jun 26, 2020 | 1:43 PM

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील कुरबूर थांबते ना थांबते तोच, महाराष्ट्राच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या धुसफुशीने वेग घेतला आहे. मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. पण गोम म्हणजे संजय कुमार यांच्या नियुक्तीच्या आदेशावर अतिरिक्त सचिवांची म्हणजे सीताराम कुंटे यांची सही अपेक्षित असताना, उपसचिवांनी स्वाक्षरी केली आहे. (Maharashtra Mantralay secretary conflicts )

मुख्य सचिवांच्या नियुक्तीचा आदेश उपसचिवांच्या स्वाक्षरीनं झाल्याने, अधिकाऱ्यांमधील चढाओढ दिसून येत आहे. अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी स्वाक्षरी करण्यास टाळल्याची चर्चा आहे. सीताराम कुंटे हे मुख्य सचिवपदाच्या रेसमध्ये होते. मात्र त्यांच्याऐवजी संजय कुमार यांची नियुक्ती झाल्याने, कुंटे नाराज असल्याची चर्चा आहे.  इतकंच नाही तर संजय कुमार यांच्यासाठी मेहतांनीच ताकद लावल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे नाराज कुंटे मंत्रालयाकडे फिरकलेच नसल्याचं देखील कळतंय.

वाचा : IAS Sanjay Kumar | कोण आहेत महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव संजय कुमार? 

यानिमित्ताने मंत्रालयातील सचिवांमधील नाराजीला ऊत आल्याचं दिसून येत आहे. सीताराम कुंटे यांच्या नाराजीमुळे उपसचिवांनीच आदेश काढल्याची जोरदार चर्चा आहे. सीताराम कुंटे हे मुख्य सचिवपदाचे दावेदार होते. मात्र सध्या सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या कुंटे यांना आता गृह विभागाची जबाबदारी सोपवली जाण्याची चिन्हं आहेत.

तर दुसरीकडे कुंटे यांच्या जागी सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे सुपूर्द केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

कोण आहेत सीताराम कुंटे?

  • सीताराम कुंटे हे 1985 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी
  • सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सध्या कार्यरत
  • 2012 ते 2015 या कालावधीत मुंबई महापालिकेचे आयुक्तपद
  • मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले
  • महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक विभाग हाताळण्याचा अनुभव
  • महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून अनुभव

संबंधित बातम्या  

IAS Transfer | गृह आणि सामान्य प्रशासन विभागातही खांदेपालट, कुंटे-सौनिक यांना नवी जबाबदारी?  

Ajoy Mehta | अजोय मेहतांना मुदतवाढ नाही, मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती  

 IAS Sanjay Kumar | कोण आहेत महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव संजय कुमार?  

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.