आता सर्वच मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आलीय; राऊतांपाठोपाठ भास्कर जाधवही आक्रमक

भाजपकडून आघाडीतील मंत्र्यांचे घोटाळे काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील सर्वच मंत्र्यांना भाजपला प्रत्युत्तर दिलं होतं. (maharashtra minister should answer bjp, says bhaskar jadhav)

आता सर्वच मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आलीय; राऊतांपाठोपाठ भास्कर जाधवही आक्रमक
भास्कर जाधव
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 3:37 PM

मुंबई: भाजपकडून आघाडीतील मंत्र्यांचे घोटाळे काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील सर्वच मंत्र्यांना भाजपला प्रत्युत्तर दिलं होतं. राऊतांपाठोपाठ शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही भाजपला सर्वच मंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे.

भास्कर जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. सर्व मंत्र्यानी आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. कारण केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी लागल्या आहेत. शिवाय केवळ मराठी अधिकाऱ्यांना सातत्याने टार्गेट केलं जातं आहे. धक्कादायक म्हणजे या होऊ घातलेल्या धाडी आणि त्यांच्या तारखा भाजपचे नेते आधी सांगत आहेत. त्यामुळे याचा अर्थ असा होता की यंत्रणा भाजपसाठी काम करत आहेत? असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

कुठे नेऊन ठेवला भारत माझा

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडला पोटनिवडणूक लागली आहे. त्याठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी ते काहीही करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. 2014 पूर्वीची भाजपची आंदोलनं पाहिली तर लक्षात येईल की हे डोक्यावर सिलेंडर घेऊन जायचे. त्यावेळी प्रत्येकवेळी म्हणायचे कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. आता वेळ आली आहे म्हणायची ‘कुठे नेवून ठेवला आहे भारत माझा’, असा टोला त्यांनी लगावला.

दरेकरांना टोला

राज्यात कुठलीही घटना घडली तरी प्रवीण दरेकर स्टुडिओमध्ये बसलेले दिसतात. याचा अर्थ असा होता की एकतर ते स्टुडिओमध्ये जाऊन बसलेले असतात किंवा मीडियाचे लोकं त्यांच्या घरी जाऊन बसलेले असतात. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवीण दरेकर उपलब्ध असतात, असा चिमटा त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना काढला.

त्या टीकेची माहिती नाही

माँ कांचनगिरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी कांचनगिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कांचनगिरी कोण आहेत हे मला माहिती नाही. कशाच्या आधारावर ते बोलले मला माहिती नाही

भाजप निदान मोठ्या नेत्याचं तरी ऐकेल

रामदास आठवले यांनी म्हटले आहे की आयकर विभागाच्या धाडीने अजित पवार यांना कोणताही फरक पडणार नाही. निदान भाजप त्यांच्या घटक पक्षातील एका मोठ्या नेत्यांचं तरी नक्की ऐकतील, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णय, 40 टक्के तिकिटं महिलांना देणार, प्रियंकाचा नारा, लडकी हुँ लड सकती हुँ !

अजित पवारांना या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही; रामदास आठवेलंचं मोठं विधान

मुंबई महापालिका कर्मचारी, पोलिसांविरोधात किरीट सोमय्यांची तक्रार, अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी

(maharashtra minister should answer bjp, says bhaskar jadhav)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.