मुंबईत अखेर पावसाचं आगमन; सोशल मीडियावर मात्र पोस्टचा ‘पाऊस’, कुणी खिडकीतून पाऊस टिपला, तर कुणी गाडीतून…

| Updated on: Jun 24, 2023 | 11:05 AM

Mumbai Rains Update : सोशल मीडियावर पावसाच्या व्हीडिओंची बरसात; मुंबईकरांनी टिपलेला सुखावणारा पाऊस

मुंबईत अखेर पावसाचं आगमन; सोशल मीडियावर मात्र पोस्टचा पाऊस, कुणी खिडकीतून पाऊस टिपला, तर कुणी गाडीतून...
Follow us on

मुंबई : पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या मुंबईकरांसाठी आजची सकाळ सुखावणारी आहे. कारण आज अखेर पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईतील दादर, परळ, लालबाग, लोअर परळ भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच ठाणे,नवी मुंबईच्या परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. जून महिना उजाडल्यापासूनच मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत होते. आज अखेर मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

एकीकडे पावसाने हजेरी लावलीय. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र पोस्टचा पाऊस पडतोय. मुंबईच्या विविध भागात पडलेल्या पावसाचे व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.

कुणी आपल्या खिडकीतून दिसत असलेला पाऊस टिपलाय तर कुणी कामासाठी जायला घराबाहेर पडल्यावर आपल्या गाडीतून दिसणारा पाऊस टिपला आहे.या व्हीडिओंना तितकेच भन्नाट कॅप्शन्सही देण्यात आले आहे.

मुंबईकरांना पावसाच्या शुभेच्छा!, येत्या मंगळवारी 100mm पावसाचा अंदाज आहे, असं म्हणत मुंबई वेदर या अकाऊंटकडून ट्विट करत पावसाची माहिती देण्यात आली आहे.

काय पाऊस आलाय…, असं म्हणत एका डॉ. राहुल बक्सी यांनी पावसाचा व्हीडिओ शेअर केला आहे.

मुंबई मेट्रोतून दिसणारी पावसाची दृश्येही एका प्रवाशानं ट्विट केली आहेत.

वेलकम टी मुंबई! म्हणत हा बाल्कनीतून टिपलेला पावसाचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.

गुड मॉर्निंग मित्रांनो, मान्सून मुंबईत दाखल झालाय, असं म्हणत हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.

पाऊस, लोकल आणि बस म्हणजे प्रेम, असं म्हणत लोकलमधून टिपलेला व्हीडिओ ट्विटर शेअर करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये अधिकृतपणे पावसाचं आगमन झालं आहे, असं म्हणत हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

खिडकीतून दिसणाऱ्या पावसाचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.