“झोपी गेलेला कुंभकर्ण जागा झाला”;आदित्य ठाकरे यांच्यावर ‘या’ नेत्याची सडकून टीका…

उद्धव ठाकरे यांचे मित्र चित्रकार रामनाथकर मुंबई महानगरपालिकेला मोफत लोगो करुन देणार होते. मात्र त्यांना लोगो तयार करून दिल्यानंतर महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे त्याचे 32लाखाचे बिल आले.

झोपी गेलेला कुंभकर्ण जागा झाला;आदित्य ठाकरे यांच्यावर 'या' नेत्याची सडकून टीका...
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 4:30 PM

मुंबईः मुंबई महानगरपालिकेत रस्ते घोटाळ्यावरून आता वातावरण प्रचंड तापले आहे. एकीकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या त्या मागणीवरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फक्त आताच्या रस्ते घोटाळ्याची चौकशी न करता मागील काही वर्षे चाललेल्या घोटाळ्याचीही चौकशी करावी अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना झोपी गेलेला कुंभकर्ण जागा झाला असल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे.

ठाकरे गटाला शिंदे गटाने धक्का दिल्यानंतर आणि विविध घोटाळ्यांची चौकशी लावल्याप्रकरणी आता यांच्या खाली फटाके वाजले म्हणून त्यांना जाग आली असल्याची सडकून टीकाही संदीप देशपांडे यांनी केली आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांनी फक्त आताच्याच घोटाळ्यावर न बोलता त्यांनी 2011 मध्ये जे रस्त्याचे कंत्राट काढले होते. त्या कंत्राटामध्येही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता.

त्यामध्ये तीन कंत्राटे होती त्यातील पहिले कंत्राट हे 278 कोटीचं, तर दुसरं कंत्राट हे 352 कोटी आणि 339 कोटी रुपायांची होती.

या कंत्राटामध्येही कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. या तीन टेंडरवरून राज ठाकरे यांनी मनपातील सत्ताधाऱ्यांबरोबर चर्चा केली होती असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्या घोटाळ्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली

तसेच 2012 मध्येही शाळेतील वस्तू वाटपावरून मोठा घोटाळा करण्यात आला होता. शालेय विद्यार्थ्यांना 37 वस्तू देण्यात येतात. त्यामध्ये वस्तू खरेदी करताना लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे.

त्या प्रकरणांचीही चौकशी आदित्य ठाकरे करणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.तर 2013 मध्ये कचरा व्यवस्थापन समितीचा लोगो वरून 32 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे मनसेने उघडकीस आणले होते.

उद्धव ठाकरे यांचे मित्र चित्रकार रामनाथकर मुंबई महानगरपालिकेला मोफत लोगो करुन देणार होते. मात्र त्यांना लोगो तयार करून दिल्यानंतर महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे त्याचे 32लाखाचे बिल आले.

त्यावेळी मनसेने त्या बिलाबाबत आक्षेप नोंदवत तो घोटाळा उघडकीस आणला असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. तर 2014 मध्ये खड्डे, रस्त्यांबाबत प्रायव्हेट कन्लटन्सी करण्यासाठी आणि त्यातून सर्व्हेक्षण करण्यासाठी 786 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते.

त्या प्रकरणाचीही चौकशी आदित्य ठाकरे यांनी केली पाहिजे अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तर 2015 मध्ये शालेय मुलांनी टॅबवर अभ्यास करावा त्यासाठी टॅबचा टेंडर काढून ते व्हिडीओकॉन कंपनीला देण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांना 4 हजार ते 5 हजार रुपयांना मिळणारे टॅब 12 हजार रुपयांचे टॅब विकत घेण्यात आले, आणि एक वर्षाच्या आत ते बंदही पडले त्यावरही त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी अशी टीका त्यांनी केली आहे.

तर 2017 मध्ये ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्ट, 2018 मध्ये पेंग्विन आणण्यात आलेले पेंग्विन आणि त्यामध्ये झालेला घोटाळा तर 2019 मध्ये कोविडच्या काळातही कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला होता, त्याही प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.