गुजरातची लोकसंख्या आपल्यापेक्षा निम्मी, तरी त्यांना जास्त लसींचा साठा, संयमी राजेश टोपे कडाडले

केंद्र सरकारने लसींचे वाटप करताना प्रत्यक्ष रुग्णसंख्या हा निकष न ठेवता प्रति दक्षलक्ष रुग्णांचे प्रमाण हे परिमाण वापरले पाहिजे. | Rajesh Tope Coronav Vaccine

गुजरातची लोकसंख्या आपल्यापेक्षा निम्मी, तरी त्यांना जास्त लसींचा साठा, संयमी राजेश टोपे कडाडले
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 2:00 PM

मुंबई: गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत 1 कोटी लसींचा (Corona vaccine) साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 1 कोटी 14 लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली. (Health Minister Rajesh Tope on Covid vaccine stock form Central govt)

ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले. आम्हाला केंद्र सरकारशी भांडायचे नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्यही करत आहे. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रत्येक आठवड्याला असणारी 40 लाख लसींची गरज लक्षात घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्राकडे जवळपास 9 लाख लसी आहेत. हा साठा दीड दिवस पुरेल. केंद्र सरकारने नव्याने 17 लाख लसी दिल्या असल्या तरी आठवड्याला 40 लाख या मागणीच्या तुलनेत हा साठा अपुरा आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई ही आर्थिक राजधानी आणि व्यापाराचे केंद्र आहे. औद्योगिकदृष्ट्याही महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत बराच मोठा आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना रुग्णांची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसींचे वाटप करताना प्रत्यक्ष रुग्णसंख्या हा निकष न ठेवता प्रति दक्षलक्ष रुग्णांचे प्रमाण हे परिमाण वापरले पाहिजे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

‘महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा नीट काम करत नाही, हा आरोप खोटा’

राजेश टोपे यांनी संपूर्ण पत्रकारपरिषदेत केंद्र सरकारवर थेट टीका करणे टाळले. याऐवजी त्यांनी आकडेवारी सादर करत केंद्राच्या लसवाटप धोरणातील त्रुटी दाखवून दिल्या. महाराष्ट्रातील आरोग्ययंत्रणा कोरोना परिस्थिती नीटपणे हाताळत नाही, हा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा आरोप चुकीचा आहे. आम्ही योग्य रितीने काम करत आहोत. महाराष्ट्रापेक्षा दिल्ली, गोवा आणि पुदुचेरीचा डेथ रेट जास्त आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या बाबतीत पारदर्शक धोरण आहे, असे टोपे यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य खाते आम्हाला सहकार्य करत आहे. आम्हाला त्यांच्याविषयी तक्रार नाही. पण कोरोना लसीच्या वाटप करताना गैरव्यवस्थापन होत आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

कोरोना लसीचा तुटवडा संपवण्यासाठी रोहित पवारांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले…

(Health Minister Rajesh Tope on Covid vaccine stock form Central govt)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.