Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद नाहीच?; प्रवीण दरेकर यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार

Maharashtra New CM 2024 : प्रवीण दरेकर यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार आहे. प्रविण दरेकर यांच्या प्रतिक्रियेनंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद नाहीच? अशी चर्चा होऊ लागली आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा प्रविण दरेकर यांनी केला आहे. वाचा सविस्तर बातमी...

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद नाहीच?; प्रवीण दरेकर यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार
प्रविण दरेकर, एकनाथ शिंदेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 11:30 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे. सर्वाधिक जागांवर भाजप आघाडीवर दिसत आहे. अशात महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याची चर्चा होत आहे. भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मोठं यश दिलेलं आहे. आम्हाला यशाची खात्री होती. पण इतकं यश मिळेल असं वाटलं नव्हतं. लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. महाराष्ट्राचे आभार… महायुतीचं सरकार येत आहे. ज्यांचे जास्त उमेदवार जिंकणार, त्याांना जास्त संधी असते. भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत, असं दरेकर म्हणाले.

लोकांनी विकासाला मतदान केलं- दरेकर

प्रविण दरेकरांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांचं विमान आता जमीनीवर लँड करण्याची आवश्यकता आहे. केवळ शिवीगाळ करून विजय मिळत नाही. ग्राऊंड रिअॅलिटी समजायला हवी. जनतेने विकासाच्या बाजूने मतदान केलं आहे. जे धर्म युद्ध देवेंद्र फडणवीस यांनी पुकारलं होतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही सगळे एक आहोतचा नारा जनतेने मान्य केला. केंद्रात भाजपचं सरकार आहे. अशात राज्यातही जर महायुतीचं सरकार आलं तर राज्याचा विकास होऊ शकतो, असं लोकांना वाटलं. त्यामुळे जनतेने हा कौल दिलेला आहे, असं प्रविण दरेकर म्हणालेत.

विरोधकांवर निशाणा

विरोधक वारंवार टीका करायचे. द्वेष मत्सर करायचे पण मतदारांनी शांतपणे मतदान केलेलं आहे. लोकसभेत झालेली चूक आता दुरुस्त केलेली आहे. लोकसभेला चूक केल्याची खंत लोकांच्या मनात होती. लोकसभेला नरेंद्र मोदी यांना पाठबळ देण्यात आपण मागे पडल्याचं लोकांच्या लक्षात आलं, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. मागच्या अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने जे काम केलं. त्याला लोकांनी पाठिंबा दिला आहे. लोकांच्या कल्याणाचं काम केलं. विकास केला. त्यामुळे केवळ शिव्या देणाऱ्या लोकांच्या मागे जनता गेली नाही, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.