वेदांता-फॉक्सक्वानला महाराष्ट्राने दिली होती इतक्या कोटींची ऑफर; तरीही प्रकल्प गुजरातमध्येच गेला…
वेदांता-फॉक्सक्वान प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
वेदांता-फॉक्सक्वान प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकल्पाच्या राजकारणात राज ठाकरे, सुप्रिया सुळे, नाना पटोले यांनी जोरदार टीका केली असून एवढा मोठा प्रकल्प गुजरात गेलाच कसा असा सवाल उपस्थित केला जात आहे. वेदांता-फॉक्सक्वानला गुजरातपेक्षा महाराष्ट्रापेक्षा 39 हजार कोटींची सवलत देण्यात आली होती. तर गुजरात सरकारकडून मात्र फक्त 29 हजार कोटींची सूट देण्यात आली आहे. या कंपनीबाबत ही माहिती उघड झाल्याने राज्याचे औद्योगिक आणि आर्थिक नुकसान झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.