महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती, राज्य लॉकडाऊनच्या वाटेवर, राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील एक पाऊल पुढे टाकणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. | Governor Bhagat Singh Koshyari CM Uddhav Thackeray

महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती, राज्य लॉकडाऊनच्या वाटेवर, राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 3:33 PM

मुंबई: राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीवरुन दीर्घकाळ रंगलेला वाद, अधुनमधून होणाऱ्या शाब्दिक लढाया आणि काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने विमानातून प्रवास करण्यास नाकारलेली परवानगी, अशा अनेक कारणांमुळे आमनेसामने येणाऱ्या महामहिम भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यातील खुंटलेला संवाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्याने सध्या राज्य मोठ्या संकटात सापडले आहे. अशावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील संवाद पुन्हा सुरु होणे, ही सकारात्मक बाब ठरु शकते. (Governor Bhagat Singh Koshyari writes letter to CM Uddhav Thackeray to greet gudi padwa 2021)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन वर्षाभिनंदन. हे हिंदू नवे वर्ष आपणाकरिता तसेच कुटुंबातील सर्वांकरिता यश, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचणी प्रार्थना, असा मजकूर राज्यपालांच्या पत्रात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील एक पाऊल पुढे टाकणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात कोरोना लस, रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणि इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच विरोधी पक्ष सरकारला फारसे सहकार्य करताना दिसत नाही. अशावेळी मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारशी संवाद साधण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे. राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकार यांचे आतापर्यंत फारसे पटलेले नाही. मात्र, आता संकटाच्या काळात तरी हे दोघे हातात हात घालून चालणार का, हे पाहावे लागेल.

मुख्यमंत्री आजच निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार : अस्लम शेख

“महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची (Maharashtra Lockdown) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली (Maharashtra Lockdown guidelines) आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी दिली.

“गेल्या आठवड्यापासून आपण मीटिंग घेऊन सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली. आपण लोकांचीही मतं जाणून घेत आहोत. ब्रेक द चेन यानुसार आज निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. मुंबई शहरामध्ये किंवा या राज्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त टेस्ट केले आहेत. त्यामुळे केस जास्त आहेत. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणार आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

‘महाराष्ट्रात 12-13 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता; परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये, सरकार तुमची काळजी घेईल’

Maharashtra Lockdown: ‘सरकारला लॉकडाऊन करताना आनंद होत असेल का?’ नाना पाटेकरांचा आर्त सवाल

Maharashtra Lockdown Updates : मुख्यमंत्री आजच निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार : अस्लम शेख

(Governor Bhagat Singh Koshyari writes letter to CM Uddhav Thackeray to greet gudi padwa 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.