राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरचा पुरवठा 10 दिवसांत सुरळीत होणार, वडेट्टीवारांचा दावा

राज्यात रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुढील 10 दिवसात नीट केला जाईल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरचा पुरवठा 10 दिवसांत सुरळीत होणार, वडेट्टीवारांचा दावा
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 4:33 PM

मुंबई : राज्यात कोरोना लसीसह विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा तुटवडा भासत आहे. तसंच रेमडेसिव्हीरचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात उघड झालाय. अशावेळी राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. राज्यात रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुढील 10 दिवसात नीट केला जाईल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढलंय. त्याला काही कंपन्यांनी पुरवठा दिला आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन कॉन्स्टेंटरचाही पुरवठा योग्य केला जाईल, असंही वडेट्टवारांनी म्हटलंय. (Supply of remedivir injection and oxygen in Maharashtra will be restored in 10 days)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्याची चर्चा सुरु झाली आहे. अशावेळी केंद्रानं लॉकडाऊन लावला तर देर आये दुरुस्त आहे. आम्ही आधी लावला तर त्याला विरोध करण्यात आला. आता त्यामुळेच रुग्णसंख्या कमी होत आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. अभिनेत्री कंगना रानौतचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्याच्या निर्णयाचंही स्वागत केलंय. कंगनाचं ट्विटर ब्लॉक केलं ते योग्यच केलं. कुणीही काहीही बोलावं हे योग्य नाही. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ओळखावी. जेवढ्या मर्यादा असतील तेवढंच बोलावं. कोणत्या पक्षाची बाजू घेऊन बोलू नये, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी केलाय.

कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड

अभिनेत्री कंगना रनौतचे (Kangana Ranaut) ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रनौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

रेमडेसिव्हीरचा अनावश्यक वापर टाळाः मुख्यमंत्री

गरज नसताना रेमडेसिव्हीर दिल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. अनावश्यक रेमडेसिव्हीरचा वापर करू नये ही माझी विनंती आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) डॉक्टर्स आणि कोविड सेंटर्सना केलेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधलाय. त्यावेळी ते बोलत आहेत. रेमडेसिव्हीरच्या दररोज 50 हजार इंजेक्शनची आवश्यकता आहेत. केंद्रानं सर्व स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. आपल्याला सुरुवातीला केंद्रानं 43 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुरवलीत. रोज 35 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळतात, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे अंडरवर्ल्डचंही ‘एन्काऊंटर’; अनेक गँगस्टर, कुविख्यात कैद्यांची टरकली

तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार, वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू बिनकामाचे; डॉ. गुलेरिया यांचा इशारा

Supply of remedivir injection and oxygen in Maharashtra will be restored in 10 days

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.