Maharashtra Corona Vaccine | कोरोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र अग्रेसर, 2 कोटींचा टप्पा पार

| Updated on: May 18, 2021 | 11:57 AM

एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्रातील देशातील एकमेव राज्य ठरले आहे.(Maharashtra 2 Crore mark Corona vaccine doses)

Maharashtra Corona Vaccine | कोरोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र अग्रेसर, 2 कोटींचा टप्पा पार
corona-vaccine
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्रात 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्रातील देशातील एकमेव राज्य ठरले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राची विक्रमी घौडदोड पाहायला मिळत आहे. (Maharashtra reached a major Covid-19 milestone it crossed the 2 Crore mark in vaccine doses)

काल राज्यात 99 हजारहून अधिक नागरिकांचे लसीकरण

काल (17 मे) राज्यात 1 हजार 239 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 99, 699 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत 2 कोटी 90 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान राज्यात आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 55 हजार नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

देशात महाराष्ट्र अग्रस्थानी 

इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर आहे. त्यापाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

राज्यात 26,616 नवीन रुग्णांचे निदान

दरम्यान राज्यात काल 26,616 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल 516 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर हा 1.53 टक्के एवढा झाला. राज्यात काल 26,616 नवीन रुग्ण सापडल्यानंतर राज्यात एकूण 4,45,495 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 54,05,068 झालीय.

राज्यात काल 48,211 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात एकूण 48,74,582 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.19% एवढे झाले आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,13,38,407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,05,068 (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 33,74,258 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (Maharashtra reached a major Covid-19 milestone it crossed the 2 Crore mark in vaccine doses)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्राला मोठा दिलासा! राज्यात आज 26,616 नवे रुग्ण सापडले, मृतांची संख्याही घटली

कोव्हिडजागृती करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने बळी, IMA चे माजी प्रमुख केके अगरवाल यांचे निधन

येणाऱ्या काळात लहान मुलांना कोरोनाचा धोका, मोदी सिस्टिमला झोपेतून जागं व्हावं लागेल: राहुल गांधी