राज्यात आज ‘राजकीय दसरा मेळावे’; ठाकरे- शिंदे- मुंडे संबोधित करणार, जरांगेंही राजकीय घोषणा करणार?

Maharashtra Dasara Melava : राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आज दसऱ्याच्या दिवशी राज्यात आज 'राजकीय दसरा मेळावे' होणार आहेत. ठाकरे- शिंदे- मुंडे संबोधित करणार आहेत. जरांगेंही राजकीय घोषणा करणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे,

राज्यात आज 'राजकीय दसरा मेळावे'; ठाकरे- शिंदे- मुंडे संबोधित करणार, जरांगेंही राजकीय घोषणा करणार?
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 8:10 AM

आज साडे तीन मुहुर्तांपैकी एक असणारा दसरा सण आज साजरा होत आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. सरसंघचालक मोहन भागवत थोड्याच वेळात संबोधित करतील. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्यात दसरा मेळावे होत आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. तर तिकडे बीडमध्येही दोन दसरा मेळावे होणार आहेत. बीडमधील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तर बीडच्या नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा होणार आहे. त्यामुळे आजच्या राज्यात राजकीय दसरा मेळाव्यामध्ये आव्वाज कुणाचा? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा

मुंबईतील शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. पण या मेळाव्यावर पावसाचं सावट दिसतं आहे. मागचे दोन दिवस मुंबईत मुसळधार पाईस झालाय. त्यामुळे शिवाजी पार्कवरही पाणी साचलं होतं. आताही शिवाजी पार्कवर चिखल असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या मेळाव्याकडे लक्ष लागलं आहे.

आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष आहे. शिवसेना शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भव्य असा स्टेज उभारला आहे. स्टेज च्या बाजूला 7 मोठे एलईडी स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. आझाद मैदानावर सर्वत्र बॅरिकेटिंग करून, दीड ते दोन लाख शिवसैनिक बसतील एवढी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दसरा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे काय रणशिंग फुकतील? शिवसैनिकांना कोणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बीडमध्ये दोन दसरा मेळावे

बीडमध्ये दोन दसरा मेळावे होत आहेत. भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत आहे. तर मराठा आरक्षणसाठी लढा देणारे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्यातील नारायण गड या ठिकाणी दसरा मेळावा घेत आहेत. रात्रीपासून या मेळाव्यासाठी लाखो मराठा बांधव नारायण गडावर जमायाल सुरुवात झाली आहे. तब्बल 200 एकर परिसरात मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरणार असल्याचं मनोज जरांगेंनी आपल्या भाषणात अनेकदा म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आजच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जरांगे काही मोठी घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.