School News : मुलांनो… यंदा मामाच्या गावाला उशिरा जायचं! शाळांच्या एप्रिलमधील उन्हाळी सुट्ट्या रद्द, फक्त अभ्यास!

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आलीय. एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.

School News : मुलांनो... यंदा मामाच्या गावाला उशिरा जायचं! शाळांच्या एप्रिलमधील उन्हाळी सुट्ट्या रद्द, फक्त अभ्यास!
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 6:36 PM

मुंबई : विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोना काळात (Corona) मागील दोन वर्षात अधिकाधिक काळ शाळा बंदच होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं. हे नुकसान भरुन काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं (School Education Minister) एक मोठा निर्णय घेतलाय. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) रद्द करण्यात आलीय. एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नाही.

उन्हाळी सुट्टीतही अभ्यास

कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षाच्या काळात अवघे काही दिवस शाळा सुरु राहिल्या. पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र, त्यालाही अनेक मर्यादा असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. तसंच विद्यार्थ्यांचंही मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. अशावेळी शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून केली जात होती. त्यानुसार शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांचा कस लागत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एप्रिल महिन्यात शाळा पूर्णवेळ सुरु ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता एप्रिल महिन्यातील उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्ट्यांमध्येही अभ्यास करावा लागणार आहे.

पालकांचे सुट्टीचे बेत रद्द

मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की पालकांना फिरण्याचे वेध लागतात. मागील दोन वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळेही अनेक कुटुंब घरातच अडकून पडली होती. यंदा कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. तसंच सरकारकडून अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. अशावेळी यंदा पालकांनी मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की फिरण्याचे बेत आखले होते. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्यातही शाळा पूर्णवेळ सुरु ठेवण्याचा निर्णय शाळेल शिक्षण विभागानं घेतला आहे. त्यामुळे पालकांना आता आपला उन्हाळी सुट्टीचा बेत बदलावा किंवा रद्द करावा लागणार आहे.

इतर बातम्या : 

झोपाळ्यावर बसले, शहाळ्याचं पाणी प्यायले, देवाला गाऱ्हाणंही घातलं, Aaditya Thackeray रमले मामाच्या गावात

Sharad Pawar : आमदारांना घरं देण्यावरुन शरद पवारांनी फटकारलं! ठाकरे सरकारला पर्यायही सुचवला

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.