मोठी बातमी: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. | Maharashtra shops lockdown

मोठी बातमी: राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 10:28 AM

मुंबई: राज्यातील व्यापारी समाज लॉकडाऊन उठवण्याची मागणी करत असताना ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा (Shops) अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. (Maharashtra govt give permission to open hardware and construction related material shops)

तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील, अशा साहित्यांची दुकाने आणि व्यवसाय सुरु करण्यास सरकारने परवानगी देऊ केली आहे. त्यामुळे आता शहरांमध्येही हार्डवेअर आणि पावसाळी साहित्याची दुकाने सुरु करता येतील. अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी देण्यात आलेल्या वेळेतच ही दुकाने सुरु राहतील. मात्र, कोविड नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

छत्र्या, ताडपत्री, रेनकोटची दुकाने उघडता येणार

राज्य सरकारने छत्र्या, ताडपत्री आणि रेनकोटची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात घरांची शाकारणी, त्याचप्रमाणे शहरी भागात गळती असणाऱ्या ठिकाणी ताडपत्री लावून बंदोबस्त करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या दुकानांचा अत्यावश्यक दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

‘पुण्यात 1 जूनपासून सरसकट सगळीच दुकानं उघडायला परवानगी देऊ नका’

येत्या 1 जुनपासून पुण्यात सरसकट अनलॉक करु नका, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांनी मांडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता एकाच झटक्यात सर्वकाही अनलॉक (Unlock) करणे योग्य ठरणार नाही. सर्व दुकाने एकाचवेळी उघडण्यास परवानगी देता कामा नये, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता पुण्यात सरसकट अनलॉक योग्य ठरणार नाही. येत्या शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत आपण ही भूमिका मांडू, असे मोहोळ यांनी सांगितले. पुणे शहरात रुग्णसंख्या कमी होत असली तरी तातडीने पूर्ण अनलॉक करून उपयोग नाही. त्यामुळे टप्प्याटप्याने अनलॉक करणे गरजेचे आहे. सुरुवातीला फक्त शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवायला परवानगी द्यावी. त्यानंतर हळहळू सुट द्यावी, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

‘मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन फक्त ‘ज्ञान’ देतात, आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणारच’

Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या; व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती

(Maharashtra govt give permission to open hardware and construction related material shops)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.