Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेत मविआचा पराभव अटळ, शेलारांचा दावा; पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला

या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पराभव अटळ असल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय. तर दुसरीकडे नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणत पटोलेंना जोरदार टोला लगावला आहे.

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेत मविआचा पराभव अटळ, शेलारांचा दावा; पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला
पालिकेच्या "दप्तर" दिरंगाईबाबत आदित्य ठाकरे उत्तर द्या, विद्यार्थ्यांच्या साहित्यावरून आशिष शेलार आक्रमकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 11:15 PM

मुंबई : जसजशा विधान परिषदेच्या निवडणुका (Maharashtra Vidhan Parishad Election) जवळ येत आहेत, तस तसा सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने तिकडे भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.  तर इकडे महाविकास आघाडीही (Mahavikas Aghadi) त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सावध पाऊलं टाकत आहे. दुपारच्या बैठकीनंतर भाजपने (BJP) आज पुन्हा संध्याकाळी खास विधान विधान परिषदेसाठी एक बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पराभव अटळ असल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय. तर दुसरीकडे नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणत पटोलेंना जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडीनेही आपले सर्व मोठे नेते तसेच अनेक अपक्ष आमदार हे तातडीने मुंबईला बोलवले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीला चांगलीच रंगत येताना दिसत आहे.

आशिष शेलार यांची बैठकीनंतरची प्रतिक्रिया

आघाडीचा पराभव अटळ

विधान परिषद निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सर्व आमदार सदविवेक बुद्धीला स्मरून भाजपाला पुन्हा मतदान करतील. हा निकाल भाजपाच्या बाजूने लागेल. रणनिती आखताना योग्य आणि सावध पावले टाकतोय. त्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केलाय. तर नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे, काँग्रेस नेतृत्वास विनंती आहे, ठाण्यात त्यांना रुग्णालयात घेऊन जा, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच नानांना पराभव दिसतोय, म्हणूनच ते उडाणटप्पू सारखे स्टेटमेंट करत आहेत. म्हणूनच मला बोलावे लागत आहे. मित्र पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, असेही ते म्हणाले आहेत.

आघाडीचे आमदारही आम्हाला मदत करतील

तर विधान परिषदेच्या तयारीबाबत बोलताना ते म्हणाले, सर्व सहकारी सोबत काम करतोय.  राज्यसभेत महाविकास आघाडीतील आमदारांनी छातीवर हात ठेवून मत दिले नाही हे सांगायचे धाडस ते करणार नाहीत, अपक्षच नव्हे तर महाविकास आघाडीचे आमदारही यावेळी आम्हाला मदत करतील, असे सूचक विधानही आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टोलेबाजी केली आहे. संजय राऊत मित्र पक्षांच्या आमदारांना घोडेबाजार बोलले, शिवसेनेत अंतर्गत धुसफूस वाढली आहे. तर महाविकास आघाडीतही विचका झालेला आहे, त्यामुळे भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास यावेळी शेलारांनी व्यक्त केला आहे. आता महाविकास आघाडी भाजपचे हे आव्हान कसं थोपवणार? हे तर निवडणुकीचे निकालच सांगतील.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.