288 जागांवर कुणाची सरशी? महायुती की महाविकास आघाडी?; कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा?

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Counting Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. 288 जागांसाठी मतमोजणी केली जात आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये कोण आघाडीवर आहे? कोण पिछाडीवर आहे? कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा? वाचा सविस्तर बातमी....

288 जागांवर कुणाची सरशी? महायुती की महाविकास आघाडी?; कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 11:16 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज आहे… कोण सत्तेत असणार? कोण विरोधात? याचा फैसला आज होणार आहे. 288 पैकी 163 जागांवर महायुती पुढे आहे. तर 110 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजप 102 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गटाचे 38 उमेदवार पुढे आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट 27 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गट 24 जागांवर आघाडीवर आहे. 38 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीवर आहेत.

सांगलीतील मतमोजणीचे अपडेट्स

सांगली जिल्हा 8 विधानसभा मतदारसंघात भाजप चार ठिकाणी भाजपा आघाडीवर आहे. सांगली, मिरज, जत, शिराळा मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. इस्लामपूर, तासगाव कवठेमंकाळ या मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस पलूस कडेगाव या मतदारसंघात एक आघाडीवर आहेत.

सांगलीतून भाजपचे सुधीर गाडगीळ आघाडीवर आहेत. मिरजमधून भाजपचे सुरेश खाडे आघाडीवर आहेत. जतमधून भाजपचे गोपीचंद पडळकर आघाडीवर आहेत. शिराळामधून भाजपची सत्यजित देशमुख आघाडीवर आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे इस्लामपूर मधून जयंत पाटील आघाडीवर आहेत. शरद पवार राष्ट्रवादीमधून तासगाव कवठेमंहाकाळ मधून रोहित पाटील आघाडीवर आहेत. पलूस कडेगाव मधून काँग्रेसचे विश्वजीत कदम आघाडीवर आहेत. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सुहास बाबर आघाडीवर आहेत.

चाळीसगावमध्ये काय स्थिती?

चाळीसगाव मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांची आघाडी कायम आहे. सातव्या फेरीतही मंगेश चव्हाण यांना 26402 मतांची आघाडी आहे. चाळीसगाव विधानसभेतून मंगेश चव्हाण यांना मोठी आघाडी आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेश पाटील सातव्या फेरीतही पिछाडीवर आहेत.

रावेरमध्ये अमोल जावळे भाजपचे उमेदवार 22हजार 555 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी पिछाडीवर आहेत. रावेरमध्ये भाजपच्या उमेदवाराची जोरदार मुसंडी मारली आहे. नाशिकच्या दिंडोरीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांना 26399 मतांची आघाडी आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनिता चारोस्कर यांची पिछाडी कायम आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.