मुंबईत महायुतीत बंडखोरीचं पीक; पक्षाने तिकीट नाकारल्याने या ठिकाणी बंडोबांनी दंड थोपटले
Mahayuti Rebel : तिकीट वाटपाचा कार्यक्रम जसजसा अंतिम टप्प्यात येत आहे. तसतशी बंडखोरांची संख्या वाढत आहे. यंदा चार पक्ष मैदानात आहेत. पण आघाडी आणि युती धर्मामुळे अनेकांना तिकीट वाटपात स्थान न मिळाल्याने त्यांनी मैदानात उतरून नाराजी जाहीर केली आहे. मुंबईत महायुतीत या ठिकाणी बंडोबांनी झेंडा फडकवला आहे.
![मुंबईत महायुतीत बंडखोरीचं पीक; पक्षाने तिकीट नाकारल्याने या ठिकाणी बंडोबांनी दंड थोपटले मुंबईत महायुतीत बंडखोरीचं पीक; पक्षाने तिकीट नाकारल्याने या ठिकाणी बंडोबांनी दंड थोपटले](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/Mahayuti-Rebels-Mumbai.jpg?w=1280)
जागा वाटपाचं कवित्व थोड्यात वेळात संपणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अनेकदा ताणल्या गेले. पण आता जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात स्थान न मिळाल्याने काही जण नाराज झाले आहेत. आघाडी आणि युती धर्मामुळे अनेकांना तिकीट वाटपात स्थान न मिळाल्याने त्यांनी मैदानात उतरून नाराजी जाहीर केली आहे. मुंबईत महायुतीत या ठिकाणी बंडोबांनी झेंडा फडकवला आहे. मुंबईत महायुतीला काही मतदारसंघात तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. जर या बंडोबांना वेळीच समज दिली नाही. अथवा त्यांची समजूत काढली नाही तर काही जागा धोक्यात येऊ शकतात. मुंबईत या ठिकाणी महायुतीच्या डोक्याला ताप झाला आहे.
महायुतीत तीन ठिकाणी बंडखोरी
मुंबईत महायुतीत तीन ठिकाणी बंडखोर उमेदवार समोर आले आहेत. त्यात भाजप आणि शिंदे सेनाचा शिलेदारांनी बंडाळीची आरोळी ठोकली आहे. इच्छुक असतानाही पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधातच अपक्ष म्हणून उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. काही मतदारसंघात या बंडखोरांचा जनसंपर्क तगडा आहे. त्यांचे अनेक भागात व्यक्तिगत संबंध पण चांगले आहेत. त्या बळावर त्यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/Bajaj-Pulsar-N-125-5.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/Small-Saving-Scheme.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/Abdul-Sattar-attack-on-Raosaheb-Danve-Kalyan-Kale.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/Manoj-Jarange-attack-on-Chandrakant-Patil.jpg)
या मतदारसंघात बंडखोरीचं पीक
मुंबादेवी इथून शायना एनसीविरोधात भाजपचेच अतूल शाह हे आज अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत. पक्षाने त्यांच्या नावाचा विचार न केल्याने त्यांनी बंडखोरीचा नारा दिला आहे. या मतदारसंघात आता चुरस दिसणार आहे. तर बांद्रा पूर्व येथे शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. आज सकाळी ९.३० वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे दिसून येते. जिशान सिद्दीकी यांना सरमळकर यांचे आव्हान उभे असले. मातोश्रीच्या अंगणातच तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तर मानखुर्द अणुशक्तीनगर येथे एनसीपीच्या सना मलिक विरोधात भाजपचे माजी नगरसेवक बबलू पांचाल यांची बंडखोरी केली आहे. आज ते शक्ती प्रदर्शन करतील. तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकून निलेश भोसले यांना तिकीट न मिळाल्याने ते बंडखोरीच्या तयारीत आहेत. या मतदारसंघात ही तिरंगी लढत दिसेल.