भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी; विदर्भात इतक्या जागावर लढणार अजित पवार गट, जनसन्मान यात्रेपूर्वीच धर्मरावबाबा आत्राम यांनी ठोकले शड्डू
Maharashtra Vidhansabha Election 2024 Vidarbha : विदर्भावर भाजपचं बारीक लक्ष असतं. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीबाबत पण भाजप सकारात्मक आहे. नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडक्वार्टर आहेत. या बालेकिल्ल्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मोठा दावा केला आहे.
विदर्भ भाजपसाठी कळीचा मुद्दा आहे. विदर्भात भाजपचे कमळ फुलवण्याच्या स्वप्नाला महायुतीतूनच आव्हान उभं ठाकण्याची चिन्हं आहे. विदर्भ हा तसा भाजपचा बालेकिल्ला. या ठिकाणी अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीने पण मोठा दावा केला आहे. आज अजितदादांची जनसन्मान यात्रा गडचिरोली येथे पोहचली. त्यापूर्वीच धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपचे टेन्शन वाढवले. त्यांनी राष्ट्रवादी विदर्भातून इतक्या जागांवर लढणार असल्याचा दावा केला आहे.
जनसन्मान यात्रेचा मोठा उत्साह
गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यात अजित दादा ची जन सन्मान यात्रा येत आहे मोठा उत्साह आहे. दुसऱ्या टप्प्याचा हा शेवटचा टप्पा आहे अति दुर्गम नक्षल भागात दादा येत आहे. दादाच्या यात्रेचा दुसऱ्या टप्प्यात शेवटचा टप्पा आहे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
विदर्भात 20 जागा लढवणार
विदर्भात 20 जागा आम्ही लढवणार आहोत आणि शंभर टक्के निवडून येणाऱ्या जागा ची मागणी आम्ही करणार आहोत. लाडकी बहीण श्रेय हे कुठलेही पक्षाचा नाही हे महायुतीचं आहे. महायुतीमधील लहान पासून सगळ्याच पक्षांचे श्रेय आहे. महायुती मुळेच हा सगळा कार्यक्रम होत आहे. दादा हे उपमुख्यमंत्री आहे अर्थमंत्री आहेत महायुतीचे आहेत आणि ते निधी देतात ते महायुतीच्या वतीने देतात आहे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करूनच हे सगळे निर्णय घेतले जातात हे कोणाचे श्रेय नाही तर हे महायुतीच श्रेय आहे, असे आत्राम म्हणाले.
सुप्रिया सुळे, जयंत पाटील इकडे येणार आहेत साहेबांनी घर फोडण्याची कामे केली आधी पक्ष फोडला आता त्यांच्यामुळे घर फोडणार आहे, माझं घर सुद्धा फोडण्याचे त्यांची तयारी आहे. आमच्याकडे 60 जागा आहे आणि मी पहिल्याच मागणी केली होती की 90 जागा वर आम्ही मागणी करणार आहोत दादांनी आता 60 जाण्याची मागणी केली म्हणजे आम्ही ज्या 100% निवडून येणाऱ्या जागा आहेत त्या लढणार आहोत. जागा वाटपा संदर्भात बोलणे सुरू आहे. सहयोगी पार्ट्यांसोबत सुद्धा बोलणं सुरू आहे. लहान पक्षांसोबत बोलणं सुरू आहे लवकरच त्यातून मार्ग निघेल, असे त्यांनी सांगितले.