‘वोट जिहाद’ प्रकरणात मोठी अपडेट; किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर पोलिसांची धडक कारवाई
Vote Jihad Maharashtra Vidhansabha Election 2024 : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वोट जिहादाचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. त्यातच कोकणातून बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली. या सर्व प्रकरणात अजून एक अपडेट समोर येत आहे. पोलिसांनी वोट जिहाद प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्दे आणि गुद्दे समोर येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या निवडणुकीत वोट जिहाद होत असल्याचा आरोप केला. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे. मालेगाव येथील बँकेतून 125 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर काल कोकणात पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दोघांच्या आवळल्या मुसक्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर वोट जिहादचा आरोप केला आहे. वोट जिहादच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी देण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला. मालेगाव बँकेत बेहिशोबी 125 कोटी रुपये आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली. या प्रकरणातील मास्टरमाईंड सिराज मोहम्मद याला आणि नाशिक मर्चेंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मालेगावमध्ये बेहिशोबी पैशांचा पाऊस
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव येथील बँकेत बेहिशोबी पैसा हवालामार्फत जमा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी 125 कोटी रुपये विविध बँक खात्यात जमा झाल्याचे आणि तो पैसा विविध खात्यात हस्तांतरीत केल्याचा आणि रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. हा पैसा वोट जिहाद असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर यापूर्वी मालेगावमध्ये 250 कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम आल्याचे समोर आले होते. हवाला रॅकेटद्वारे ही रक्कम येत असल्याचे समोर आले होते.
एकाच महिन्यात 2500 व्यवहार
एका महिन्यात देशभरातील 200 बँक खात्यातून 2500 व्यवहार झाले. त्यातून रक्कमेची मोठी उलाढाल करण्यात आली. मालेगाव येथील सिराज अहमद आणि मोईन खान यांनी गरीब लोकांच्या नावाने बँक खाती उघडली. त्यात चार दिवसांत 125 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यातील 37 खात्यातील जमा रक्कम रोखीत बदलण्यात आली. ही रक्कम लागलीच काढण्यात आली.
7 नोव्हेंबर रोजी FIR
सोमय्या यांनी निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय सीबीडीटी, आरबीआयसह अनेक ठिकाणी लिखित तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाच्या सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली होती. याप्रकरणात मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही रक्कम परदेशातून आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मालेगावातील 17 गरीब लोकांच्या नावे खाते उघडल्याचे समोर आले आहे.