BJP Candidate : जागा तुमची माणसं आमची; उमेदवारांच्या साखर पेरणीचा गोडवा भाजप चाखणार? की बंडोपंत तोंडचा घास हिरावणार..BJP ची इतकी नेते सेनेसह अजितदादांच्या गोटात

Maharashtra Vidhansabha Election 2024 BJP Smart Play : विधानसभा निवडणुकीच्या वाटाघाटीत भाजपाने स्मार्ट खेळी खेळली आहे. त्यांचे अनेक शिलेदार आता मित्रपक्षांच्या तिकिटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. जागा तुमची पण माणसं आमची असा हा फॉर्म्युला आहे., ही साखर पेरणी फायदेशीर ठरणार का?

BJP Candidate : जागा तुमची माणसं आमची; उमेदवारांच्या साखर पेरणीचा गोडवा भाजप चाखणार? की बंडोपंत तोंडचा घास हिरावणार..BJP ची इतकी नेते सेनेसह अजितदादांच्या गोटात
जागा तुमची, माणसं आमची
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 1:51 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लागला. रूसवे फुगवे काढण्यात जादा वेळ खर्ची न घालवता महाविकास आणि महायुतीने एकदाचे डोक्यावरील ओझे कमी केले. आता उमेदवार निवडून आणण्याची मोठी कसरत या दोन्ही गटांना करावी लागणार आहे. 2019 मध्ये भाजपने सर्वाधिक जागा पटकावल्या. 105 जागांवर भाजप विजयी झाली. अर्थात 2014 पेक्षा त्यांच्या जागा कमी झाल्या होत्या. पण राज्यात अखंड सेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून बिनसले आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर लोट्स ऑपरेशनने राज्याच्या राजकारणाची दिशा पालटवली. महायुती अस्तित्वात आली. शिंदे सेना आणि अजितदादा गटाला सोबत घेत भाजपने सत्ता मिळवली. भाजप हा मोठा पक्ष होता. पण त्यांना महायुतीच्या तडजोडीत नमतं घ्यावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीच्या वाटाघाटीत भाजपाने स्मार्ट खेळी खेळली आहे. जागा तुमची पण माणसं आमची असा हा फॉर्म्युला आहे. त्यांचे अनेक शिलेदार आता मित्रपक्षांच्या तिकिटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या साखर पेरणीचा भाजपला किती फायदा होणार?

निवडणूक कार्यक्रम असा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashatra Vidhansabha Election 2024) जाहीर झाली. त्यासाठी आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून लागू झाली. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबरला जारी करण्यात आली होती. या 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल अंतिम तारीख होती. तर आज 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.

हे सुद्धा वाचा

राजकारणात नवीन ट्रेंड

या निवडणुकीत भाजपाने अजून एक नवीन ट्रेंड आणला. लोकसभेत हा प्रयोग ठळकपणे दिसला नाही. पण या विधानसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीत मोठी खेळी खेळली आहे. जागा वाटपातही भाजपाने मोठी तडजोड केली असे नाही. 2019 मध्ये अखंड शिवसेनेसोबत युती असताना भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर यावेळी जागांचा आकडा 148 च्या घरात आहे. शिंदे सेनेला 85 जागा तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 51 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे गेल्या विधानसभेच्या तुलनेत भाजपाने 16 जागा कमी घेतल्या. पण त्याचवेळी भाजपचे शिलेदार (BJP Candidate) मित्र पक्षांच्या गोटात पाठवले. म्हणजे भाजपाची नेते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना (Eknath Shinde Shivsena) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar NCP) तिकिटावर निवडणुकीत उतरली आहेत.

भाजपच्या या स्मार्टखेळीमुळे काही मतदारसंघात भाजपला डॅमेज कंट्रोल करता आले आहे. भाजपच्या या स्मार्ट मूव्हमुळे विधानसभेत महायुतीची जिंकण्याची खात्री वाढली आहे. भाजपाला जे मतदारसंघ जागा वाटपात वाट्याला आली नाहीत. त्यामध्ये मित्र पक्षांच्या तिकिटावर भाजप पक्षातील नेते निवडणूक लढवणार आहे. त्यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा होताच शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने त्यांना लागलीच विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले. त्यामुळे भाजपने एकीकडे 16 जागा कमी घेतल्या असल्या तरी मित्र पक्षांकडून त्यांच्याच शिलेदारांना निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरवले आहेत. आता या मतदारसंघातील इच्छुकांची नाराजी आपसूकच ओढावली जाणार आहे. या आयात उमेदवाराला निवडून देण्याचे शिवधनुष्य इतर पक्षातील कार्यकर्ते उचलतील का हा प्रश्न आहे?

मतदारसंघ तुमचा, माणूस आमचा

अर्जुनी मोरगाव मतदारसंघ : विदर्भात भाजपाने काही ठिकाणी हा डाव साधला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे हा प्रयोग झाला. राजकुमार बडोले हे दोनदा भाजपाचे आमदार होते. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यावर लागलीच बडोले यांनी हातावर ‘घड्याळ’ बांधले.

बाळापूर मतदारसंघ : बाळापूर मतदारसंघात भाजपने खेळी खेळली. हा मतदारसंघ भाजपाला सुटला नाही. जागा वाटपात हा मतदारसंघ न सुटल्याने बळीराम शिरसकर यांनी हाती धनुष्यबाण घेतला. शिंदे सेनेकडून शिरसकर आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात लढतील.

कन्नड मतदारसंघ : छत्रपती संभाजीनगरमधील या मतदारसंघात पती विरुद्ध पत्नी असा सामना रंगणार आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावासाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आणि निवडणुकीसाठी धनुष्यबाण हाती घेतला. ठाकरे गटाकडून येथे आमदार उदयसिंग राजपूत यांना तिकीट देण्यात आले आहे. तर संजना जाधव यांच्याविरोधात हर्षवर्धन जाधव पण मैदानात उतरले आहेत.

परभणी मतदारसंघ : परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंद भरोसे यांनी कमळाऐवजी यावेळी धनुष्यबाण हाती घेतले. हा मतदारसंघ शिंदे सेनेच्या खात्यात गेल्यावर त्यांनी शिंदे सेनेत टुणकन् उडी मारली आणि त्यांना तात्काळ तिकीट पण मिळाले. यापूर्वी त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांचा सामना ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांच्याशी होईल.

उस्मानाबाद मतदारसंघ : उस्मानाबाद मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे सेनेत रस्सीखेच सुरू होती. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आग्रही होते. ही जागा शिंदे सेनेकडे गेली. त्यामुळे भाजपाने येथे पण डाव टाकला. अजित पिंगळे हे भाजपाचे तालुका अध्यक्ष होते. त्यांनी जागा शिंदे गटाकडे जाताच तिकडे उडी घेतली. त्यांना तातडीने उमेदवारी जाहीर झाली. पण या मतदारसंघात लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ : मराठवाड्यात भाजपाने येथे अजून एक गळ टाकला. या लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला होता. ते नाराज होते. त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लोहा कंधार मतदारसंघासाठी तिकीट देण्यात आले आहेत.

नवापूर मतदारसंघ : भाजपाने खानदेशात या मतदारसंघात खेळी खेळली. नंदुरबारचे माजी खासदार माणिकराव गावीत यांचे सुपुत्र भरत गावीत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. भरत गावीत यापूर्वी भाजपामध्ये होते. 2019 मध्ये भरत गावित यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. त्यांचा सामना काँग्रेसच्या शिरीष कुमार नाईक यांच्यासोबत होईल.

संगमनेर विधानसभा मतदारसंघ : संगमनेर विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या शिंदे गटाकडे गेला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि भाजप कार्यकर्ते अमोल खताळ यांनी शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण चिन्हं हाती घेतलं. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात ते निवडणूक लढवतील.

नेवासा मतदारसंघ : अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर नंतर नेवासामध्ये भाजप पॅटर्न दिसले. शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटली. भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचा पक्ष प्रवेश करत त्यांच्या हाती धनुष्यबाण सोपवण्यात आला. यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या शंकरराव गडाख यांचे आव्हान असेल.

करमाळा मतदारसंघ : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघात सुद्धा भाजपने खेळी खेळली. ही जागा शिंदे सेनेकडे गेली. त्याचवेळी भाजपा नेते आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्याचवेळी त्यांची उमेदवारी निश्चित झाली.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ : सांगलीतील इस्लापूर मतदारसंघात भाजपाने स्मार्ट खेळी खेळली. सांगली भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले यांनी हातावर घड्याळ बांधले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात ते निवडणूक लढवतील.

फलटण-कोरेगाव मतदारसंघ : सातारा जिल्ह्यातील फलटण कोरेगाव मतदारसंघ जागा वाटपात अजित पवार गटाला गेला. पण निवडून येण्याचे मेरीट ही फुटपट्टी लावून भाजपचे सचिन कांबळे पाटील यांची वर्णी लावण्यात आली. त्यांनी घड्याळ हाती बांधले आणि त्यांना तिकीट मिळाले. याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक चव्हाण हे आहेत.

तासगाव- कवठेमहाकाळ मतदारसंघ : सांगली जिल्ह्यातील या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना शरद पवार गटाने या मतदारसंघातून उतरवले आहेत. तर या मतदारसंघात भाजपने स्मार्ट चाल केली. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी वेळेवर अजित पवार गटाचे घड्याळ हाती बांधले.

कुडाळ- मालवण मतदारसंघ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण मतदारसंघात जायंट किलर वैभव नाईक यांच्याविरोधात भाजपाचे नारायण राणे यांनी पुन्हा तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे. राणेंचे पुत्र निलेश राणे मैदानात उतरले आहेत. त्यांनी शिवधनुष्य हाती घेतले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी विरोधकांना आस्मान दाखवले.

पालघर मतदारसंघ : या मतदारसंघातून श्रीनिवास वनगा इच्छुक होते. तर राजेंद्र गावित हे भाजपकडून इच्छुक होते. ही जागा शिंदे सेनेला सुटली. भाजपचे राजेंद्र गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी धनुष्यबाण चिन्हं हाती घेतले.

बोईसर मतदारसंघ : पालघर जिल्ह्यातील या दुसर्‍या विधानसभा मतदारसंघात सुद्धा भाजपने खेळी खेळली. जागा शिंदेसेनेला पण एकाही निष्ठावानाला उमेदवारी नाही अशी स्थिती आहे. येथे भाजपमधून शिंदे सेनेत आयात केलेले विलास उरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघ : या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मुरजी पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी राजकीय नैतिकता दाखवत माघार घेतली होती. यावेळी ही जागा शिंदे सेनेकडे गेली. तेव्हा मुरजी पटेल यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आणि तिकीट मिळवले. ठाकरे गटाकडून या मतदारसंघात ऋतुजा लटके त्यांच्याविरोधात निवडणूक लढवतील.

भिंवडी पूर्व मतदारसंघ : भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांना शिंदे सेनेने धनुष्यबाण हाती दिली. ही जागा शिंदे सेनेकडे जाताच, शेट्टी यांनी सेनेत प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

मुंबादेवी मतदारसंघ : मुंबादेवी मतदारसंघ शिंदे सेनेकडे गेला. त्यापूर्वीच भाजपमधून शायना एनसी या शिंदे सेनेत गेल्या होत्या. या ठिकाणी भाजपने मोठी खेळी केली. मतदार संघ आणि उमेदवार दोन्ही बदलले आहेत.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.