CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले…

CM Eknath Shinde attack on Mahavikas Aaghadi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्याचा घणाघात त्यांनी केला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे. त्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी मविआवर तोंडसूख घेतले.

CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 11:25 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्याचा आरोप शिंदे यांनी केला. एक दिवसापूर्वी मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीने योजनांचा पाऊस पाडला. महिला मतदारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी योजनांची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे. महाविकास आघाडी हे प्रिंटिंग मिस्टिकवाले असल्याचा टोला सुद्धा त्यांनी यावेळी हाणला.

महाविकास आघाडीला खुलं आव्हान

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दोन, सव्वा दोन वर्षाच्या कालावधीचा आढावा घेत, महाविकास आघाडीला खुलं आव्हान दिले आहे. आमचे गेल्या सव्वा दोन वर्षातील काम आणि महाविकास आघाडीचे अडीच वर्षातील काम समोर ठेवा. त्यांनी काय काय केले, काय निर्णय घेतला ते त्यांनी सांगावे. त्यांनी आमच्या किती कामात अडथळा आणला. खोडा घातला ते सांगावे, मी त्यांना खुलं आव्हान देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हे सुद्धा वाचा

ते तर नकल बहाद्दर

आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. त्यांनी अगोदर विरोध केला. या योजनेविरोधात महाविकास आघाडीतील नेते हायकोर्टात गेले आणि आता तेच ही योजना पळवत आहेत. तेच आता आम्हाला फॉलो करत आहेत. आमच्या सर्व योजना टॉप आहेत. ते आता आमच्या सर्व योजना कॉपी करत आहेत. मतदार राजा हुशार आहे. त्यांना हा सर्व प्रकार कळत असल्याचा चिमटा मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढला.

आम्ही लाडक्या बहिणीप्रमाणेच लाडक्या शेतकरी बांधवांसाठी कर्ज माफी केली. आता महाविकास आघाडी आमच्या मागे मागे येत आहे. ते आमची कॉपी करत आहे. त्यांनी आमच्या योजनांची कॉपी केली आहे. लोकांना माहिती आहे, हे काहीच देणार नाहीत. ते प्रिंटिंग मिस्टेकवाले आहेत. राजस्थान, कर्नाटक, हिमाचलमध्ये त्यांनी योजना सुरु केल्या. पण पुढे त्यांच्याकडे पैसा उरला नाही. तेव्हा त्यांनी केंद्राकडे पैशांची मागणी केली.

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात आम्ही अगोदरच पैसे जमा केले. आम्ही डिसेंबरपर्यंतची तरतूद केली. योजनेचा हप्ता अगोदरच बहि‍णींच्या खात्यात जमा केला. आम्हाला आचारसंहिता लागणार हे माहिती होते. आमच्या बहि‍णी महाविकास आघाडीच्या या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. त्या आम्हाला निवडून देतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.
भुजबळांचा खळबळजनक दावा, 'ईडीपासून सुटका माझ्यासाठी पुनर्जन्मच अन्...'
भुजबळांचा खळबळजनक दावा, 'ईडीपासून सुटका माझ्यासाठी पुनर्जन्मच अन्...'.
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा.
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली.
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं.
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?.
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती.
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले.
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'.