कुठे नाराजी, कुठे रस्सीखेच…; महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत काय चाललंय?

| Updated on: Sep 26, 2024 | 12:17 PM

Mahavikas Aghadi and Mahayuti Seat Allocation : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाबाबत काय चाललंय? कोणत्या जागांवर रस्सीखेच सुरु आहे? कुठे नाराजी आहे? वाचा सविस्तर......

कुठे नाराजी, कुठे रस्सीखेच...; महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत काय चाललंय?
विधानभवन
Follow us on

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. जागावाटपावरून कुठे रस्सीखेच तर कुठे नाराजी पाहायला मिळत आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पालघर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि शिवसैनिकांकडून स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांविरोधात आक्रोश सभा घेण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक पदाधिकारी, सहसंपर्कप्रमुख आणि उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या विरोधात नाराजी आहे. ठाकरे गटातील स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठ नेत्यांविरोधात आक्रोश सभा घेण्यात येणार आहे.

पालघरच्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये ज्योती ठाकरे भांडण लावत असल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी हे शिंदे गटाला मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकी अगोदर अनेक पद बदलण्यात आली मात्र शिवसैनिकांना विश्वासात न घेतल्याच शिवसैनिकांच म्हणणं आहे. पालघर जिल्ह्यात ज्या नवीन पदावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ती नियुक्ती तात्काळ थांबवावी शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

बारामतीत ‘बॅनर’वॉर

बारामतीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बॅनरची जोरदार चर्चा होत आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बॅनरमुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचा बारामतीचा आमदार व्हावा अशी बॅनरमधून इच्छा व्यक्त केली आहे. बॅनरवर भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांचा तर भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वर्षा गायकवाड यांचा तर भावी गृहमंत्री म्हणून रविंद्र धंगेकरांचा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. बॅनरमधून बारामती विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केला विरोध जात आहे. या अगोदरही निलेश गजरमल यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहीत बारामती विधानसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार देण्याची मागणी केली होती.

कोकणात रस्सीखेच

रत्नागिरी- कोकणातल्या तीन जागांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांवर दावे – प्रतिदावे केलं जात आहेत. चिपळूण, सावंतवाडीवर शरद पवार गटाचा दावा तर राजापूरसाठी काँग्रेस आग्रही आहे. सावंतवाडी, राजापूरची जागा ठाकरे गटाची हक्काची आहे. जागा सोडवून घेऊ, असं काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या वरिष्ठांचं स्थानिक नेत्यांना आश्वासन देण्यात आलं आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या चिपळूणच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही आहे. चिपळूण विधानसभेच्या जागेवरून प्रशांत यादव आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये सुद्धा रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तीन जागांचा पेज कायम आहे.