Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Radhe Maa : बटोगे तो कटोगे’ वरून राधे माँ थेट मैदानात; कुणाला दिला पाठिंबा, म्हणाल्या काय?

Radhe Maa on 'Batoge To Katoge' : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाशिम येथील सभेत 'बटोगे तो कटोगे' असा हुंकार भरला आणि राजकीय वातावरण तापले. विधानसभेच्या रणधुमाळीत योगी आदित्यनाथ यांच्या एका वक्तव्याने वादाची ठिणगी पडली. आता या मैदानात राधे माँ यांनी पण उडी घेतली आहे.

Radhe Maa : बटोगे तो कटोगे' वरून राधे माँ थेट मैदानात; कुणाला दिला पाठिंबा, म्हणाल्या काय?
राधे माँ मैदानात
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 9:24 AM

गेल्या आठवड्यात वाशिम येथील सभेत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटोगे तो कटोगे’ असा हुंकार भरला. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातच नाही तर देशभरात दिसले. अनेक राज्यातील नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला तर काहींनी त्यांच्या वक्तव्याला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्यानंतर लागलीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’, अशी भावनिक साद हिंदू मतदारांना घातली. त्यामुळे राज्यातील राजकारणात ध्रुवीकरणाचा कार्ड फेकल्या गेले. हिंदू्च्या एकगठ्ठा मतांसाठीच हा भावनिक खेळ सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. भाजपवर महाविकास आघाडीने जोरदार प्रहार केला. तर आता या वादात आध्यात्मिक क्षेत्रातील काही जणांनी उडी घेतली आहे. साधु-संतासोबतच आता राधे माँ यांनी सुद्धा या वक्तव्यावर त्यांचे जाहीर मत मांडले आहे.

बंटेंगे तो कटेंगेला जाहीर पाठिंबा

राधे माँ यांनी “बंटेंगे तो कटेंगे” या वक्तव्याला जाहीर पाठिंबा दिला. बटेंगे तो कटेंगे,आणि एक है तो सैफ है या भाजपच्या घोषणेला आणि नव्यान प्रचारात आलेल्या वक्तव्यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. जेव्हा झाडू गोळा होतो तेव्हा त्यात शक्ती असते, असे राधे माँ म्हणाल्या. राधे माँ या यापूर्वी पण अनेकदा वादात अडकल्या आहेत. त्यांच्या दरबारावर टीका झाली आहे. पण त्यांचा भक्त परिवार कमी होण्याऐवजी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधे माँ यांच्या भूमिकेने आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

हे सुद्धा वाचा

मोदी आणि योगी यांच्या मताशी सहमत

काल रात्री तुळशीपूजनानंतर राधे माँ म्हणाली, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे. त्यांनी सभेत जे काही सांगीतले आहे, ते अगदी बरोबर सांगीतले आहे. बटोगे तो कटोगे, आणि एक है तो सेफ है हे देखील अगदी बरोबर आहे, कारण जेव्हा झाडू एकत्र येतो तेव्हा त्यात शक्ती असते. राधे माँ मुंबईच्या बोरिवलीमध्ये राहते आणि तिचे संपूर्ण कुटुंब मतदार आहे. राधे माँ आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.

मतांच्या ध्रुवीकरणासाठी प्रयोग

राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी यावरून ध्रुवीकरणाचा प्रयोग करण्यात आला. त्यासोबतच आता जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न राजकीय पक्ष करताना दिसून येत आहेत. महिला मतदारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी योजनांचा भडिमार करण्यात आला. तर जाहीरनाम्यात सुद्धा महिला, शेतकरी आणि बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर दिसून आला. त्यातच आता जातिय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्यात येत आहे.

'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले.
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.