Raj Thackeray : …तर आज चित्र वेगळं असतं, राज ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut on Raj Thackeray : महाविकास आघाडीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जोरदार झटका बसला. ईव्हीएममधील गडबडीमुळे असा निकाल लागल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Raj Thackeray : ...तर आज चित्र वेगळं असतं, राज ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊतांचा घणाघात
संजय राऊतांचा राज ठाकरेंवर घणाघात
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 2:46 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला आहे. या निवडणुकीत हाराकिरी झाल्याने त्यांची किरकिर वाढल्याचा आरोप महायुतीमधून करण्यात येत आहे. तर हा निकाल मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेसनी भूमिका घेतली आहे. इतका एकांगी निकाल लागल्याने हा ईव्हीएमचा निकाल असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

चंद्रचूड यांच्यावर टीका

निकालाच्या दिवशी पहिल्या दोन तासात बरोबरची लढाई होती. मात्र हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान होऊ दिलं.याला जबाबदार कोण असेल तर सुप्रीम कोर्टचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे आहेत. अडीच वर्ष त्यांनी निर्णय दिला नाही. घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाही त्यांना माफ करणार नाही. आमदारांमध्ये पक्ष बदलण्याची भीती राहिली नाही. चंद्रचूड यांचं नाव काळ्या अक्षराने लिहिले जाईल.

हे सुद्धा वाचा

जनतेच्या न्यालायलात न्याय विकत घेण्यात आला. आम्ही लढाई अर्धवट सोडणार नाही. मतविभागणी झाली. हा मोठा फटका आम्हाला बसला. वंचित, आणि मनसे ह्यांचे उमेदवार उभे केले होते, असा आरोप त्यांनी केला. गुजरातची लॉबी मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार आहे. गुजरातमध्ये त्यांनी शपथविधी घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांच्यावर घणाघात

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे उमेदवार विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते. पण त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. जनतेने त्यांना जनादेश नाकारला. लोकसभेत राज ठाकरे यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा दिला होता. तर यावेळी मनसेने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यावर आता संजय राऊत यांनी तोंडसुख घेतले. राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आज चित्र वेगळं असतं, असे ते म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.