पिंक मतदान केंद्राची चर्चा, सेल्फी पॉईंट पण आकर्षणाचा केंद्र, पण फोटु काढणार तरी कसा? निवडणूक आयोगच विसरला नियमाचा अडथळा

Pink Polling Booths : आज राज्यात लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. त्याचा उत्साह संपूर्ण राज्यात विविध मतदान केंद्रावर दिसून येत आहे. मुंबईतील मतदार केंद्रावर पण गर्दी उसळली आहे. यावेळी पिंक मतदान केंद्राचा वेगळा प्रयोग निवडणूक आयोगाने केला आहे. तर सेल्फी पॉईंट पण चर्चेचा विषय ठरला आहे.

पिंक मतदान केंद्राची चर्चा, सेल्फी पॉईंट पण आकर्षणाचा केंद्र, पण फोटु काढणार तरी कसा? निवडणूक आयोगच विसरला नियमाचा अडथळा
मुंबईत विविध रंगांच्या मतदान केंद्राची चर्चा
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 10:00 AM

राज्यात विधानसभा निवडणुकीचा महाउत्सव दिसत आहे. सकाळपासूनच राज्यातील विविध मतदान केंद्रावर सर्वच वयोगटातील मतदारांनी भाऊगर्दी केली आहे. मतदानाचा उत्साह संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. मुंबईतील मतदार केंद्रावर पण गर्दी उसळली आहे. यंदा पिंक मतदान केंद्राचा वेगळा प्रयोग निवडणूक आयोगाने राबवला आहे. त्याची खास चर्चा होत आहे. तर सेल्फी पॉईंट पण आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले आहे. पण निवडणूक आयोगाच्या एका नियमामुळे सेल्फी पॉईंट पाहून अनेक मतदारांचा हिरमोड झाला आहे.

मुंबईत 420 उमेदवार

मुंबईत विधानसभेला एकूण 36 मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदारसंघात एकूण 420 उमेदवार आहेत. तर 1 कोटी 2 लाख, 29 हजार 708 मतदार हे त्यांचे भवितव्य ठरवतील. तर 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये 10 हजार 117 मतदान केंद्र उभारण्यात आले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 46 हजार 816 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 25 हजार 696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी अगोदरच गृह मतदान झाले आहे. अधिकार्‍यांच्या उपस्थित हे मतदान घेण्यात आले. मुंबईतील 6 हजार 272 ज्येष्ठ नागरिकांनी गृह मतदानाचा हक्क बजावला.

हे सुद्धा वाचा

गुलाबी मतदान केंद्राची चर्चा

मुंबईसह राज्यातील काही मतदान केंद्रांवर पहिल्यांदाच पिंक पोलिंग बुथ उभारण्याचा प्रयोग राबविण्यात आला आहे. मुंबईत सुद्धा गुलाब मतदान केंद्राची चर्चा आहे. मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदारांचा वेळ वाचावा यासाठी हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला आहे. मतदार जेव्हा मतदान केंद्रावर येईल त्यावेळी त्याला एक स्लिप देण्यात येईल. त्या स्लिपच्या मागे एक रंगाची पटी, ठिपका असेल. त्यानुसार पिवळा, गुलाबी, निळा, आकाशी, लाल रंगाचे मतदान केंद्र करण्यात आले आहे. त्यासाठी त्याच रंगाचे खास कार्पेट सुद्धा अंथरण्यात आले आहे. त्यावरून चालत जाऊन त्या रंगाच्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ही एक हटके संकल्पना आहे.

सेल्फी काढू तरी कसा?

काही मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि तरुणांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सेल्फी पॉइंटचा प्रयोग गेल्या काही निवडणुकांपासून सुरू केला आहे. याठिकाणी मतदान झाल्यावर मतदारांना फोटो काढता येईल. पण यावेळी 100 मीटर परिसरात मोबाईल न वापरण्याची ताकीद देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी मोबाईल एकतर घरी ठेवल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

Non Stop LIVE Update
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल.
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?.
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?.
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.