कोणती सेना दाखवणार दमखम; इतक्या जागांवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात थेट टक्कर

Uddhav Thackeray-Eknath Shinde : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा सामना रंगणार आहे. या दोघांसाठी ही विधानसभा निवडणूक लिटमस टेस्ट सारखी आहे. दोन्ही गट इतक्या जागांवर आमने-सामने येणार आहे. त्यातील 12 जागा या एकट्या मुंबईतील आहेत.

कोणती सेना दाखवणार दमखम; इतक्या जागांवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात थेट टक्कर
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 4:27 PM

महाराष्ट्रात यंदा महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यात या दोन्ही गटात पहिल्यांदाच सामना रंगेल. उद्धव सेना आणि शिंदे सेना राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत इतक्या जागांवर आमने-सामने येणार आहे. हे दोन्ही गट निवडणुकीत त्यांची ताकद दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. कोणत्या सेनाचा वाघ फोडणार डरकाळी? महाराष्ट्रात कोणत्या सेनेची आरोळी उठणार हे लवकरच समोर येईल.

इतक्या जागांवर दोन्ही गटात चुरस

शिवसेनेच्या दोन्ही गटात 49 जागांवर चुरस दिसेल. यामधील 19 जागा या मुंबई आणि परिसरातील आहेत. तर मुंबई शहरातील 12 जागांवर अटीतटीची लढत दिसेल. याशिवाय मराठवाड्यात आणि कोकणता 8 जागांवर मशाल आणि धनुष्य-बाण चिन्हात सामना दिसेल. तर पश्चिम महाराष्ट्रातील चार जागांवर मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षातील अनेक जण एनडीएचा, पर्यायाने महायुतीचा भाग झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत आहेत. ते काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

हे सुद्धा वाचा

दोघांसाठी लिटमस टेस्ट

राजकीय विश्लेषकांच्या मते, विधानसभा निवडणूक उद्धव सेना आणि शिंदे सेनेसाठी लिटमस टेस्ट असेल. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगत आहेत. तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगत आहेत. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप शिंदे सेना करत आहे. आपण कधीच काँग्रेससोबत जाणार नसल्याचे शिंदे सेनेचे म्हणणे आहे.

शिंदे सेने पुढे हे मोठे आव्हान

एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक मोठे आव्हान आहे. महायुतीचे सरकार आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे, असं नाही तर आपल्या पक्षाचा जनाधार वाढवणे हे पण मोठे चॅलेंज त्यांच्यासमोर आहे. त्यांना 40 हून अधिक जागा मिळवायच्या आहेत. एनडीएमध्ये सहभागी होताना त्यांच्याकडे इतकेच आमदार होते. लोकसभा निवडणुकीत दोन्ही सेना 13 जागांवर एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. त्यामध्ये उद्धव गटाने 7 जागांवर तर शिंदे सेनेने 6 जागांवर विजय पक्का केला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.