Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार की नाही? सस्पेन्स वाढला, काय होणार घोषणा?

Maharashtra Assembly Election Dates : 2014 नंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. तर हरियाणात राजकीय आखाडा रंगणार आहे. राज्यात विधानसभेचा कार्यकाळ पाहता निवडणुकीचे पडघम आताच वाजतील का याविषयी सस्पेन्स वाढला आहे.

Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार की नाही? सस्पेन्स वाढला, काय होणार घोषणा?
राज्यात आताच निवडणुकीचा बिगुल वाजणार?
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 11:01 AM

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यातील निवडणूक तारखांची आज दुपारी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच महाराष्ट्रात पण निवडणुकांची तारीख घोषीत होण्याची चर्चा रंगली आहे. राज्यात विधानसभेचा कार्यकाळ पाहता निवडणुकीचे पडघम आताच वाजतील का, याविषयी सस्पेन्स वाढला आहे. आज दुपारी 3 वाजता यावरील पडदा उघडेल. पण राजकीय तज्ज्ञांच्या मते आताच राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी आहे.

दुपारी होणार तारखांची घोषणा

विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. विज्ञान भवनात आज दुपारी ३ वाजता विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होऊ शकते. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या टीमने या दोन राज्यांचा दौरा केला होता आणि त्यानंतर 30 सप्टेंबरपूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका होतील असं सांगण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

या दौऱ्यात आयोगाने विविध बाबींचा अभ्यास केला. अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.  विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले वाढले आहेत. त्यापार्श्वभूमीवर आयोगाने सुरक्षेची पाहणी केल्याचे समजते.  निवडणुकीत कोणतेही विघ्न येणार नाही याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.  मात्र, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ जानेवारीमध्ये संपणार आहे.

निवडणुकीविषयी सस्पेन्स वाढला

हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. सध्या ऑगस्ट महिना सुरु आहे. त्यामुळे तीन महिन्यापूर्वीच आचार संहिता लावण्याची शक्यता तशी कमीच असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. आता राज्यातील निवडणुकांची घोषणा होण्याची त्यामुळेच शक्यता नसल्याचे राजकीय विश्लेषकांचा व्होरा आहे. अर्थात दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग काय घोषणा करते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.