Weather Alert | कोकण, मुंबई, ठाणे, मराठवाड्यात ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मध्य मराराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये शनिवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मुंबई : हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरु आहे (Maharashtra Weather Alert). गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे (Maharashtra Weather Alert ).
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मध्य मराराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये शनिवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणेसह उपनगरातही ढगाळ वातावरण राहणार. तसेच, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
Night updates, IMD GFS Model guidance indicate possibilities of cloudy sky over Konkan, Madhya Mah and adjoining parts of Marathwada on 9 Jan. There could be light to mod TSRA activity over the region, reduced as compared to last 48 hrs. Mumbai Thane partly cloudy sky⛅ pic.twitter.com/1UurDVmmOA
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 8, 2021
दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. त्यामुळे आज आणि उद्या 9 जानेवारीला राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने 7 ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात केला होता. हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता.
शनिवारी मुंबईत मध्यमस्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर, 12 जानेवारीनंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंतची घट होण्याची शक्यता असेल. यामुळे थंडीत वाढ होऊ शकते.
राज्यात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 ते 9 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, 8 जानेवारीला नाशिक, औरंगाबाद, 8 आणि 9 जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत काय स्थिती?
8 आणि 9 जानेवारीला मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईचं तापमान 24 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.
काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला
मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे (Weather Alert Rain Update).
Weather Report | शनिवारी पाऊस, मंगळवारी थंडी, बाहेर पडण्याआधी हा हवामान रिपोर्ट वाचाhttps://t.co/2gDqQhAW1E#WeatherUpdate #MumbaiRain #DelhiCold
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 8, 2021
Maharashtra Weather Alert
संबंधित बातम्या :
Weather Alert | राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी, काढणीला आलेल्या पिकांवर संकट
weather alert | पश्चिमी वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण, मुंबईत पावसाच्या हलक्या सरी
Weather Alert | एकीकडे हाडं फोडणारी थंडी, त्यात पावसाळ्यासारखा मुसळधार, महाराष्ट्रात काय होणार?