Maharashtra Weather : हिवाळ्यात पावसाळा; या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा, फेंगल चक्रीवादाळामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण, हवामानाची काय खबरबात
Maharashtra Weather Fengal Cyclone Update : महाराष्ट्रात थंडी जोर धरू लागली असतानाच फेंगल चक्रीवादाळाने गुलाबी थंडी गायब झाली. सध्या राज्यावर आभाळमाया आली आहे. ऐन हिवाळ्यात काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट मिळाला आहे. हिवाळ्यात पावसाळ्याने घुसखोरी केली आहे.
फेंगल चक्रीवादळाने भारतातील दक्षिणेतील राज्यांना तडाखा दिला आहे. येथील किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठा फटका बसला. आता या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील थंडीचा जोर कमी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाला आहे. सध्या राज्यावर आभाळमाया आली आहे. ऐन हिवाळ्यात काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट मिळाला आहे. ऐन हिवाळ्यात पावसाळ्याने घुसखोरी केली आहे. काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळाने श्रीलंकेत चांगलेच थैमान घातले आहे. त्याचा परिणाम संपूर्ण मध्य आणि दक्षिण भारतावर स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्यात पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिवाळा गायब, पावसाळ्याची एंट्री
गेल्या काही दिवसात चांगलाच गारठा आला होता. राज्यात किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. थंड हवेच्या ठिकाणापेक्षा राज्यातील अनेक भागात तापमानात कमाल घसरण झाली होती. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला होता. पण राज्यातील काही जिल्ह्यांना फेंगल चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेच्या माहितीनुसार, तामिळनाडूत सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी राज्यात दमटपणा वाढलेला आहे. दुपारी उकाडा जाणवत आहे. राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर नांदेडसह काही जिल्ह्यात आणि कोकणात हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
थंडीचा जोर कमी
गेल्या काही दिवसात थंडीचा कडाका वाढला होता. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. थंड हवेच्या ठिकाणापेक्षा राज्यातील काही ठिकाणं थंडीनं गारठली होती. पण फेंगलचा पश्चिम बंगालसह हिंद महासागरात जोर वाढला होता. फेंगलचा मोर्चा दक्षिणेसह श्रीलंकेकडे वळाला आहे. त्याचा परिणाम किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांमध्ये दिसला आहे. तसा तो महाराष्ट्रातही दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.