Weather Alert : महाराष्ट्र गारठला! नागपूरसह विदर्भातही हुडहुडी, निफाडमध्ये थंडीने रेकॉर्ड मोडला

| Updated on: Dec 21, 2020 | 8:12 AM

कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून शीतलहरी या महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Weather Alert : महाराष्ट्र गारठला! नागपूरसह विदर्भातही हुडहुडी, निफाडमध्ये थंडीने रेकॉर्ड मोडला
Follow us on

मुंबई : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा राज्याला गारठवणार आहे. या आठवड्यामध्ये थंडीचा पारा (Cold) घसरणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून (Weather Department) देण्यात आला आहे. कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून शीतलहरी या महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. (maharashtra weather update cold wave in nagpur vidarbha nashik mumbai pune temperature)

आता नागपूरसह विदर्भातही थंडीची लाट पाहायला मिळाली. नागपुरात पारा 8.7 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. जम्मू काश्मिरसह उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे विदर्भात पारा आणखी घसरला आहे. दोन दिवसांत तब्बल आठ अंशानी पारा घसरला असून आजचं तापमान 9 अंशावर पोहोचलं आहे.

निफाडमध्येही किमान पारा घसरला

निफाडमध्येही किमान पारा घसरला आहे. यंदाच्या थंडीच्या हंगामातील निच्चांकी नोंद निफाडमध्ये करण्यात आली आहे. कुंदेवाडी इथल्या गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात आज 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यभर किमान तापमानात घट

वाढत्या थंडीमुळे विदर्भामध्ये काही भागांत किमान तापमानात घट होत आहे. तर यामुळे त्यामुळे गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, अकोला भागांत थंडी वाढली आहे. पुढच्या आठवड्यात मात्र ही थंडी आणखी वाढणार आहे. मुंबईतही सोमवारपासून तापमान आणखी घसरण्यास सुरुवात होईल. यामुळे मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येणार आहे.

नागरिकांनो, काळजी घ्या!

खरंतर, एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना कोरोनाचा धोकाही अद्याप कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी आणि कोरोनाचा धोका टाळण्यासाठीच्या नियमांचं पालन करावं. कोरोनाच्या संसर्गासोबतच आता इतर हिवाळी आजारदेखील बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. (maharashtra weather update cold wave in nagpur vidarbha nashik mumbai pune temperature)

इतर बातम्या –

महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा

Nagpur | नागपूरसह विदर्भात वाढणार थंडी, हवामान खात्याचा अंदाज

(maharashtra weather update cold wave in nagpur vidarbha nashik mumbai pune temperature)