राऊतांचं झिंग झिंग झिंगाट फडणवीसांच्या भीतीमुळं! नव्या वाईन धोरणावर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल!

जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. परदेशात वाईन मालकांच्या बैठकीचा ते खुलासा करतील, याची राऊतांना भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांचं झिंग झिंग झिंगाट झालंय, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय.

राऊतांचं झिंग झिंग झिंगाट फडणवीसांच्या भीतीमुळं! नव्या वाईन धोरणावर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल!
संजय राऊत, गोपीचंद पडळकर
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 2:01 PM

मुंबई:  महाराष्ट्रातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला (Wine Sale in Maharashtra) परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. यावर भाजपच्या वतीने टीकेची झोड उठवण्यात आली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा महाविकास आघाडीचा विचार आहे का, असा सवाल भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही तोंडसुख घेतले आहे. जनाब संजय राऊत (Sanjay Raut) हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. परदेशात वाईन मालकांच्या बैठकीचा ते खुलासा करतील, याची राऊतांना भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांचं झिंग झिंग झिंगाट झालंय, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय.

‘फडणवीस खुलासा करतील, याची राऊतांना भीती’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने घेतलेल्या वाईन विक्रीचे नवे धोरण आणले आहे. हे धोरण शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, असे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने देण्यात येत आहे. मात्र परदेशातील व्यावसायिकांच्या हितासाठीची ही योजना आहे, व्यावसायिकांसोबत परदेशात कोणती बैठक झाली, याचा खुलासा देवेंद्र फडणवीस करू शकतात, अशी भीती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना वाटतेय, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. ते म्हणाले, ‘जनाब संजय राऊत हे मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘ झिंग झिंग झिंगाट ‘ झालं आहे. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावंच्या गावं अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला.

‘शेतकऱ्यांसाठी असेल तर तसे स्पष्ट नमूद करा’

आमदार गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का? की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना फायदा होणार नाही, असे स्पष्ट सरकारने सांगावे.

शरद पवारांच्या नावाचा गैरवापर?

गोपीचंद पडळकर म्हणाले, माननीय शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण वाइन विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत.

इतर बातम्या-

Fire in Gandhidham Puri Express | नंदुरबारमध्ये एक्स्प्रेसला भीषण आग, तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात

Video : दहा वर्षाच्या जलपरीचा अनोखा विक्रम, काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.