“ही भूषणावह परिस्थिती नाही”; या नेत्यानं सगळ्या गोष्टीला ‘मविआ’ला धरलं जबाबदार…
महापुरुषांचा सन्मान राखणे महत्त्वाचे आहे, मात्र राज्यपालांचा निर्णय हा राष्ट्रपती घेतील असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
कल्याण: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांसह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि पंढरपूरवर दावा केला होता. त्यानंतर दोन्ही राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सकारात्मक आणि नकारात्मक मत व्यक्त करत आरोप-प्रत्यारोप केले गेले.
तर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सीमावादावर मत व्यक्त आजच्या परिस्थितीला मगाील सरकार महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मविआतील नेत्यांवर टीका केली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातल्या गावांना कर्नाटकात जायचं आहे, ही भूषणावह परिस्थिती नाही.
आज ही गावं कर्नाटकात जात असली तरी मागच्या सरकारांनी सीमावर्ती भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही आजची परिस्थिती ओढावली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला ज्या प्रमाणे सीमावादाला जबाबदार धरले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी राज्यातील अने उद्योग बाहेर जात आहेत. या प्रकरणालाही त्यांनी ‘मविआ’ला जबाबदार धरले आहे.
राज्यात येणार जे प्रकल्प आहेत. ते प्रकल्प सध्या बाहेरील राज्यात जात आहेत. त्यामुळे उद्योग बाहेर जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर विरोधकांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली होती.
स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे, भाजपचे खासदार उदयनराजे यांनी त्यांच्याविरोधात ठाम भूमिका घेतली. राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यासाठी त्यांनी आक्रोश मोर्चाचेही आयोजन केले होते.
या प्रकरणावर बोलाताना रामदास आठवले यांनी बोलताना म्हणाले की, महापुरुषांचा सन्मान राखणे महत्त्वाचे आहे, मात्र राज्यपालांचा निर्णय हा राष्ट्रपती घेतील असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
ठाकरे गटावर टीका करताना त्यांनी महाप्रबोधन यात्रेत धडाडणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याविषयीही त्यांनी टीका केली. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेत नेत्यांची कमी असल्यामुळेच सुषमा अंधारेंना आणलं आहे असा टोला ठाकरे गटावर त्यांनी लगावला आहे.
तर भीमशक्ती-शिवशक्तीविषयी बोलतानाही त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. शिवसेना-वंचित एकत्र येण्याने काहीही फरक पडणार नाही. मात्र आम्ही त्यांना थकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.