तर ठाकरे सरकारला धोका, निरुपम यांचा ‘औरंगाबाद’वर इशारा
औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. | Sanjay Nirupam
मुंबई: काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण करुन दिल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी समोर आली आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे असे त्यांनी म्हटले. (Sanjay Nirupam warns Shiv Sena over Aurangabad rename issue)
संजय निरुपम यांनी शनिवारी यासंदर्भात ट्विट केले. औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचे सरकार हे वैयक्तिक अजेंड्यावर नव्हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारे चालते. हा कॉमन मिनिमम प्रोगाम काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असा टोला संजय निरुपम यांनी शिवसेनेला लगावला. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून निरुपमांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
औरंगजेब का व्यक्तित्व विवादास्पद रहा है।उसके हर पक्ष से कॉंग्रेस सहमत हो जरूरी नहीं। संभाजी महान योद्धा थे।उनका आत्मोत्सर्ग वंदनीय है।इस पर कोई मतभेद नहीं। लेकिन सरकार चलाते समय शिवसेना महापुरुषों को बीच में लाएगी तो यकीनन गच्चा खा जाएगी।खुद तय कर ले।#SambhajiMaharaj
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 2, 2021
काँग्रेस-शिवसेनेची नुरा कुस्ती: देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद शहराच्या नामांतरच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्ती सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या (Aurangabad mahanagar palika ) नामांतराचा मुद्दा आठवतो. आतादेखील महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शिवसेनेकडून (Shivsena) औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की, शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती.
नाव बदल हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील : बाळासाहेब थोरात
राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असं थोरात म्हणाले. औरंगाबादच्या नामकरणाचा वाद पुन्हा एकदा पुढं आला असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती.
संबंधित बातम्या:
औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे : चंद्रकांत पाटील
नाव बदल हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील : बाळासाहेब थोरात
काँग्रेस-शिवसेनेची नुरा कुस्तीच, निवडणुकीनंतर औरंगाबादचा ‘तो’ मुद्दा बाजूला पडेल: देवेंद्र फडणवीस
(Sanjay Nirupam warns Shiv Sena over Aurangabad rename issue)