Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या बळावर महायुती सत्तारूढ; सत्तेत किती महिलांना संधी?

Mahayuti Cabinet Expansion : लाडक्या बहि‍णींनी भरभरून मतदान केल्याने महायुतीची राज्यात त्सुनामी आली. लाडक्या बहि‍णींच्या बळावर महायुती सत्तारूढ झाली. तर या मंत्रिमंडळात किती महिलांची वर्णी लागली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन पक्षांतील या महिला आमदारांना मिळाली संधी?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या बळावर महायुती सत्तारूढ; सत्तेत किती महिलांना संधी?
पंकजा मुंडे, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 3:13 PM

लाडक्या बहि‍णींनी भरभरून मतदान केल्याने महायुतीचा झंझावत उभ्या महाराष्ट्रात दिसून आला. 288 पैकी 232 जागांवर महायुतीने मुसंडी मारली. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. 5 डिसेंबर रोजी मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज नागपूरमध्ये अगदीच थोड्याच वेळात 4 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मंत्रिमंडळात अनेक शिलेदारांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडणार आहे. तीनही पक्षातून एका मागून एक आमदारांना मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी फोनवर निरोप धाडण्यात आला आहे. पण या मंत्रिमंडळात किती लाडक्या बहि‍णींना स्थान मिळालं, तुम्हाला माहिती आहे का? किती महिला आमदारांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे?

भाजपाकडून कुणा कुणाला संधी?

देवाभाऊच्या नवीन मंत्रिमंडळात चार लाडक्या बहि‍णींना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपाच्या तीन महिला आमदारांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला आमदाराचा समावेश आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेने एका ही महिलेला संधी दिलेली नाही. भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे. यामध्ये मुंडे आणि बोर्डीकर या मराठवाड्यातील आहेत. तर मिसाळ या पुण्यामधील भाजपाच्या आमदार आहेत.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना मंत्री मंडळात संधी दिली आहे. मागील मंत्री मंडळात सुद्धा त्यांची वर्णी लागली होती. त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं होतं. तर या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राज्यात लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेत आलो, असे विधान अजित पवारांनी आज केले होते. त्यांच्या पक्षाने एका लाडक्या बहिणीला मंत्री पद दिले आहे.

शिवसेनेकडून महिलेला नाही मंत्रीपद

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आतापर्यंत 12 जणांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. त्यात एका ही लाडक्या बहिणीला संधी देण्यात आली नसल्याचे दिसून येते. अजून पुढील एक तासात अजून काही घडामोड घडल्यास हे चित्र पालटू शकते. एकनाथ शिंदे यांनी अनेकदा आपल्या भाषणात लाडक्या बहिणीमुळे विजयी झाल्याचे सांगीतले आहे. तर ही योजना त्यांच्यामुळे आल्याचा दावा करण्यात येत होता.

या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 20 महिला या विजयी झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या भाजपाकडे आहे. भाजपाच्या 14, शिवसेनेच्या 2 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदार आहेत. यामध्ये भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांचे नाव तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांचे नाव मंत्रिमंडळात आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.