सर्वात मोठा धक्का… राज्य मंत्रिमंडळात धनंजय मुंडे, रविंद्र चव्हाण यांना डच्चू? मस्साजोग प्रकरण भोवले, तर चव्हाण यांच्यावर कोणती नवीन जबाबदारी?

Dhanjay Munde -Ravindra Chavan : शिंदे सेनेतील काही जुन्या शिलेदारांना डच्चू दिल्याच्या बातम्या येत असतानाच आता इतर मित्र पक्षातील काही मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नसल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या यादीत अजून धनंजय मुंडे तर भाजपाच्या यादीत रविंद्र चव्हाण यांचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

सर्वात मोठा धक्का... राज्य मंत्रिमंडळात धनंजय मुंडे, रविंद्र चव्हाण यांना डच्चू? मस्साजोग प्रकरण भोवले, तर चव्हाण यांच्यावर कोणती नवीन जबाबदारी?
धनंजय मुंडे, रविंद्र चव्हाण
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 11:47 AM

नागपूर हिवाळी अधिवेशनाअगोदर महायुती सरकाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातला आहे. यामुळे काल रात्रीपासूनच घडामोडींना वेग आला आहे. मुंबईसह नागपूरमध्ये वेगवान घडामोडी घडल्या. रात्रभर लॉबिंग सुरू होते. या जम्बो मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात येत आहे. तर काही जुन्या नेत्यांना पण संधी देण्यात येणार आहे. तर काहींना डच्चू देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारात तिघांच्या नावाचा पत्ता कट झाल्याचे आतापर्यंत समोर येत आहे. दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आल्याचे समोर आले आहे. तर आता अजित पवार गटाच्या शिलेदारांच्या यादीत अद्याप धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले नाही तर दुसरीकडे भाजपाच्या यादीत रविंद्र चव्हाण यांना स्थान देण्यात आले नसल्याचे दिसते.

नागपूरमध्ये बॅनरबाजी

सरकारच्या पहिल्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण नागपूरात महायुतीच्या नेत्यांची जोरदार बॅनरबाजी दिसून आली. या माध्यमातून कार्यकर्त्यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न दिसून आला.महायुतीच्या विजयाचे कर्णधार म्हणून एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे एअरपोर्ट पासून विधानभवनापर्यंत मोठ-मोठे होर्डिंग आणि बॅनर्स लागले आहेत. तर चौका चौकात ‘देवा भाऊ जो बोलता है वो करता है’, अशा आशयाचे देवेंद्र फडणवीस यांचेही मोठे होर्डिंग आणि बॅनर लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या या नेत्यांना फोन

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. अजित पवार गटाकडून चार आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, आदिती तटकरे, अनिल पाटील यांना सुनील तटकरे यांनी फोन केल्याचे समजते. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती समोर येत आहे.

धनंजय मुंडे यांचे नाव अद्याप नाही

दरम्यान धनंजय मुंडे यांचे नाव अद्याप समोर न आल्याने तर्क-वितर्क लावले जात आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यावरून बीडमध्ये वातावरण तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर येत आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यात वाल्मीक कराड यांच्यावर पण गंभीर आरोप करण्यात आला आहे.

गेल्या सहा दिवसांपासून मस्साजोग ग्रामस्थांचा संताप समोर आला आहे. या गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची डेडलाईन उलटून गेल्याचे म्हणत ग्रामस्थांनी सोमवारी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. छत्रपती संभाजीराजे हे मस्साजोगमध्ये काल दाखल झाले. त्यांनी याप्रकरणात आरोपींची अटक होईपर्यंत आणि चौकशी होईपर्यंत संबंधित नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची आग्रही मागणी अजितदादांकडे केली. त्यांचा रोख अर्थातच धनंजय मुंडे यांच्याकडे होता.

रविंद्र चव्हाणांकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पद

रविंद्र चव्हाणांकडे भाजप नवी जबाबदारी देणार आहे. रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. २०२९ मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी देण्यात येण्यात येत असल्याचे समजते.

गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?.
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.