महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?; भाजपच ‘बिग बॉस’, कोण किती जागा लढणार?

Mahayuti Space Allocation For Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. कोणता पक्ष किती जागा लढणार? वाचा सविस्तर बातमी...

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?; भाजपच 'बिग बॉस', कोण किती जागा लढणार?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 1:50 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीचं वार वाहतं आहे. पण अद्यापपर्यंत दोनही आघाड्यांचं जागावाटप जाहीर झालेलं नाही. अशातच आता काल रात्री उशिरा राजधानी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील निवडणूक आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला यावर चर्चा झाली. यात भाजपच सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती आहे. भाजप 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटा 75 ते 80 जागा लढेल. तर राष्ट्रवादी अजित पवार गट 55 ते 60 जागा लढणार असल्याची माहिती आहे.

अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

भाजप 142, शिंदे गट 66 आणि अजित पवार गट 52 जागा लढणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.  काल रात्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या वेळी अमित शाह यांच्या सोबतच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जागावाटप फॉर्म भरण्याच्या आत केलं जाईल. तुम्ही काळजी करू नका… तिघांची बैठक झाली आहे काळजी करू नका. आम्ही तिघे एकत्रित प्रेस घेऊ कुणाकुणाला किती जागा मिळाल्या आहेत ते स्पष्ट करू. महायुतीच्या जागावाटपामध्ये काहीही अडचण नाहीये, असं अजित पवार म्हणाले.

अमित शाह यांनी काय सूचना दिल्या?

महायुतीची काल रात्री दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा केली. जागावाटपाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. काही जागांवर महायुतीत अद्यापही तिढा कायम आहे. मात्र आता राज्य पातळीवर हा तिढा सोडवा अशा सूचना एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांना अमित शाह यांनी दिल्या आहेत.

मविआच्या जागावाटपाचं काय?

राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. विदर्भातील जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आज शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार होती. मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटातील वादामुळे ही यादी लांबणीवर पडली आहे.

Non Stop LIVE Update
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.