माहीम किल्ल्याचं संवर्धन होणार; 1970-72 पासून किल्ल्यावर वास्तव्य करणाऱ्यांचेही पुनर्वसन; आदित्य ठाकरेंनी दिल्या सूचना

माहीम किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करून, 1970-72 पासून किल्ल्यावरील वास्तव्यास असणाऱ्या राहिवाश्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत .

माहीम किल्ल्याचं संवर्धन होणार; 1970-72 पासून किल्ल्यावर वास्तव्य करणाऱ्यांचेही पुनर्वसन; आदित्य ठाकरेंनी दिल्या सूचना
माहीम किल्ल्याचं संवर्धन होणार - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 10:19 PM

मुंबईः ऐतिहासिक माहीम किल्ल्याचे (Mahim Fort) संवर्धन करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून त्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयातील दालनात पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आढावा बैठक घेतली.

माहिमवर राहणाऱ्यांचे होणार पुनर्वसन

या बैठकीत माहीम किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करून, 1970-72 पासून किल्ल्यावरील वास्तव्यास असणाऱ्या राहिवाश्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत .

 संरचनेची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण

किल्ल्यावरील संरचनेची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केले गेलं आहे. त्यानुसार या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 3796.02 चौ.मी. इतकं आहे. तर किल्ल्यावर एकूण अंदाजे 267 संरचना आहेत. किल्ल्यावर असणाऱ्या 314 सदनिकांना नोटीस जरी करण्यात आल्या असून शासनाच्या नियमानुसार 222 झोपड्या पात्र आहेत.

 झोपडीधारकांची छाननीसाठी कागदपत्रे

दरम्यान नोटीस जारी केल्यानंतर झोपडीधारकांनी छाननीसाठी कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांची छाननी सीनियर कॉलनी ऑफिसर, जी/उत्तर वॉर्ड यांच्यामार्फत सुरू केली असल्याचेही सांगण्यात आले आहे.

संपूर्ण प्रक्रियेचा माहितीपट तयार

माहीम किल्ल्यावरील झोपड्या झोपडपट्टी धारकांनी खाली केल्यानंतर किल्ल्यावरील झोपड्या पाडण्यास सुरुवात होणार आहे. संपूर्ण प्रक्रियेचा माहितीपट तयार करण्यासाठी मेसर्स खाकी टूर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर माहीम किल्ल्याच्या जीर्णोद्धाराची योजना आणि प्रस्ताव किल्ला रिकामा केल्यावरच एमसीजीएम पॅनेल केलेले पुरातत्त्व सल्लागार नेमून केले जाणार आहेत. प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी, एमसीझेडए्मए,एएसआ आणि इतर संबंधित प्राधिकरणांची एनओसी प्राप्त करण्यात येणार आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.