Majhi Vasundhara: माझी वसुंधरा अभियान 3.0 चा शुभारंभ, सदगुरू जग्गी वासुदेव यांची विशेष उपस्थिती
माझी वसुंधरा अभियान 3.0 चा शुभारंभ. ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव, पर्यावरण व वतावरणीय बदल विभागाचे मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न.
मुंबई: पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला असून विकास कामांचे नियोजन करताना ते निसर्गाचे नियम समजून घेऊन करणे आवश्यक आहे. माझी वसुंधरा अभियान ३.० चा शुभारंभ ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव, पर्यावरण व वतावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला.
Today, @MahaEnvCC ‘s Majhi Vasundhara Abhiyan 3.0 was launched by Shri. @SadhguruJV. GoM has partnered with @ishafoundation to collaborate efforts on food security, sustainable farming, organic farming techniques and other initiatives to proactively #SaveSoil in Maharashtra. pic.twitter.com/zRe1kiC2rN
हे सुद्धा वाचा— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 12, 2022
विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, व अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे यांच्या उपस्थितीत बी.के.सी. मुंबई, येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी “माझी वसुंधरा अभियान” व “ईशा फाऊंडेशन” यांच्या दरम्यान पर्यावरण संवर्धन, अन्न सुरक्षा, शाश्वत शेती, सेंद्रिय शेती तंत्र आणि इतर उपक्रमावर सक्रियपणे सहकार्य करण्यासाठी एकत्र काम करण्या संदर्भात सामंजस्य करारही करण्यात आला.
.
यावेळी विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, यांनी भूमी या क्षेत्रात माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली तसेच, मातीच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी “Save Soil” ही जागतिक मोहीम सुरू केली आहे त्यास शुभेच्छा दिल्या.