मुंबई : इंडिया आघाडीत निवडणुकांआधीच बिघाडीचं चित्र रंगलंय. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळाचा घोषणा केलीय. तर आपनंही स्वबळाचा सूर लावलाय. जी इंडिया आघाडी काही महिन्यांपूर्वी एकजूट होण्याचे वायदे करत एकत्रित बसली होती. त्याच इंडियात आता बिघाडी होताना दिसतेय. तृणमूलच्या ममता बॅनर्जींनी आम्ही लोकसभा निवडणूक काँग्रेसबरोबर नव्हे तर स्वबळावर लढवण्याची घोषणा केलीय. तर दुसरीकडे आपचे पंजाबमधली मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही स्वतंत्र लढण्याचं विधान केलंय. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकांआधीच आघाडीलातडे पडलेयत
३ शहरांत इंडिया आघाडीचा बैठक झाली होती. पाटणा, त्यानंतर बंगळूर आणि शेवटची बैठक मुंबईत पार पडली. यापैकी मुंबईच्या बैठकीत जिथं शक्य नसेल तिथं एकत्र लढू असाही प्रस्ताव आला., तेव्हापासून इंडिया आघाडीत मतभेदांची चर्चा रंगली होती.
इंडिया आघाडीत आप आणि काँग्रेस आहे. मात्र दिल्ली आणि पंजाबात कसं लढायचं यावरुन भांडण आहे. इंडियात आघाडीत तृणमूल आणि काँग्रेस आहे., मात्र तृणमूलमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा तृणमूलनं केलीय. तर आघाडीत डावे पक्ष सुद्धा आहेत. मात्र केरळच्या जागांवरुन काँग्रेस आणि डाव्यांमध्येही वाद रंगलेयत.