Manoj Jarange-Patil : राज्य सरकारला मोठा धक्का, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय फेटाळला

Manoj Jarage Patil : राज्यभर मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला आहे. जरांगेंच्या उपोषणाचा सातवा दिवस असून आज पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संभाषणाबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना, जरागेंनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय फेटाळून लावला आहे.

Manoj Jarange-Patil : राज्य सरकारला मोठा धक्का, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा 'तो' निर्णय फेटाळला
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 12:13 PM

मुंबई : मराठा आरक्षणासाठी परत एकदा उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणााचा सातवा दिवस आहे. दिवसेंदिवस आंदोलन उग्र रूप घेत असल्याचं दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ होत आहे. अशातच मनोज जरांगे यांनी सरकारला आणखी एक दिलाय, मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलताना जरागेंनी आरक्षणाबाबतचा तो निर्णय फेटाळला आहे.

नेमका कोणता निर्णय?

चर्चा आरक्षणावर झाली. बाकी दुसरी काही झाली नाही. आपण त्यांना स्पष्ट सांगितलं की, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला तयार नाही. समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट अधिवेश देण्याचा निर्णय घ्या. विशेष अधिवेशन बोलवा. अर्धवट आरक्षण घेणार नाही. ते तुम्ही देऊ नका असं स्पष्ट शब्दात सांगितल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

आम्ही आमच्या अभ्यासकांची 12 ते 1 वाजता बैठक बोलावली असून वकिलांशी चर्चा करणार आहोत. पण 83 क्रमांकावर ओबीसीतील जाती मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हटलंय. 2004चा जीआर आहे तो दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारीत जाती निर्माण झाल्या आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. त्याच धर्तीवर आरक्षण द्या. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. तुम्ही कितीही बहाणे सांगितलं तरी ऐकणार नाही. ते आम्ही स्पष्ट सांगितलं आहे. सरसकट प्रमाणपत्र द्या. कायदा पारित करण्यासाठी पुरावा आहे. फक्त समितीला राज्याचा दर्जा द्यायचा असल्याचं जरांगे म्हणाले.

दरम्यान, एका पुराव्यावरही आरक्षण देऊ शकता. तुमच्याकडे भरपूर पुरावे असून व्यवसाय शेती असल्याने अडचण येत नाही. कुणाचं आरक्षण कमी होणार नाही. 60 टक्के समाज ओबीसीत आहे, आम्ही थोडे आहोत. ५ कोटी मराठा आरक्षणात येत नाही. आम्ही थोडे आहोत. मराठवाडा आणि इतर भागातील आहे. ज्यांना प्रमाणपत्र हवं ते घेतील. ज्यांना नको ते घेणार नाही. कुणावर जोरजबरदस्ती नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं.

तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.
अंधारे म्हणाल्या रेड्याला कापणार; गुलाबरावांचं प्रत्युत्तर, मी तयार पण
अंधारे म्हणाल्या रेड्याला कापणार; गुलाबरावांचं प्रत्युत्तर, मी तयार पण.
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?.
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने.
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके.
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली.
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.