Video : Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | पहिल्या दिवसाचा संपूर्ण प्रवास, मनोज जरांगेंना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. पहिल्या दिवसाचा संपूर्ण प्रवास, वाटेत पत्नी आणि मुलं भेटलीत त्यानंतर मुंबईकडे कूच करत निघालेल्या जरांगे यांचा पहिला शिरुर तालुक्यातील मातोरीच्या डोंगरपट्ट्यात संपला. यावर टीव्ही 9 मराठीची स्पेशल रिपोर्ट पाहा.

Video : Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | पहिल्या दिवसाचा संपूर्ण प्रवास, मनोज जरांगेंना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 10:18 PM

मुंबई : मनोज जरांगे पाटील अखेर, मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. मुंबईतून मराठ्यांसाठी आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार करत जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून निघालेत. जरांगे पाटलांचं पत्नीनंही वाटेतच औक्षण केलं आणि यापुढेही जरांगेंच्या आंदोलनाला कायम साथ देणार, अशा भावना पत्नीनंही व्यक्त केल्या.

मनोज जरांगेंच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. 54 लाख कुणबी नोंदींच्या आधारे जातप्रमाणपत्र मिळावं. गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वत सोयऱ्यांना मराठा बांधवांच्या नोंदीच्या आधारे जातप्रमाणपत्र द्या आणि तिसरी मागणी आहे, मराठ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्या. जानेवारीपर्यंत, जरांगे पाटलांनी सरकारला वेळ दिली होती. मात्र मागण्या मान्य न झाल्यानं आता छातीवर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही म्हणत जरांगे भावूक झालेत

जरांगे आणि मराठे जस जसे मुंबईच्या दिशेनं पुढे पुढे जातील, तसे मराठा बांधव पायी मोर्चात सहभागी होतील. 26 जानेवारीला मुंबईतला मराठ्यांचा आकडा तब्बल 3 कोटींचा असेल, असा दावा जरांगेंचा आहे. तरुण-तरुणी, म्हातारे एवढं काय महिलाही जरांगेंसोबत मुंबईच्या दिशेनं पायी निघाल्यात.

आतापर्यंत सरकारच्या वतीनं जरांगेंशी चर्चेला येणारे बच्चू कडूही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आता माझी सरकार म्हणून भूमिका संपली, असं रोखठोकपणे बच्चू कडू म्हणालेत. दिवसांचा कुठं पायी तर कुठं वाहनानं प्रवास करत 26 तारखेला मुंबईत दाखल होणार आहे.प हिला दिवस बीड जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील मातोरीच्या डोंगरपट्ट्यात संपलाय.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.