Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mansukh Hiren Case : आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गौरवरही UAPA कायद्यानुसार कारवाई होणार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात NIAने अजून एक महत्वाचा निर्णय घेतलाय. आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गौर यांच्यावरही UAPA अर्थात Unlawful Activities Prevention Act नुसार कारवाई होणार आहे.

Mansukh Hiren Case : आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गौरवरही UAPA कायद्यानुसार कारवाई होणार
मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी विनायक शिंदे, नरेश गौरविरोधात UAPA कायद्यानुसार कारवाई होणार
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 10:18 PM

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात NIAने अजून एक महत्वाचा निर्णय घेतलाय. आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गौर यांच्यावरही UAPA अर्थात Unlawful Activities Prevention Act नुसार कारवाई होणार आहे. हे दोन्ही आरोपी मनसुख हिरेन प्रकरणात सध्या NIAच्या अटकेत आहेत. NIAतील एका अधिकाऱ्याने तशी माहिती दिलीय. त्यामुळे विनायक शिंदे आणि नरेश गौर यांच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे.(Vinayak Shinde and Naresh Gaur will also be charged under the UAPA Act)

यापूर्वी आरोपी सचिन वाझेवर UAPA कायद्यातील कलमे लावण्यात आली आहेत. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास आधी महाराष्ट्र ATS करत होती. पण ठाणे न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास NIAकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे ATS ने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गौर यांचा ताबाही NIAला मिळाला. त्यानंतर आता या दोघांवरही UAPA कायद्यातील कलमं लावली जाणार आहेत.

सचिन वाझेविरोधात UAPA अंतर्गत गुन्हा

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांच्या विरोधातही NIAने UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाझे यांना ताब्यात घेतल्यानंतर NIA ने मोठी कारवाई केली होती.

काय आहे UAPA कायदा?

लोकसभेत जुलै 2019 मध्ये या कायद्यातील तरतुदींना मंजुरी मिळाली. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला तपासाच्या आधारावर दहशतवादी जाहीर करण्याचा अधिकार सरकारला आहे. यापूर्वी फक्त संघटनेला दहशतवादी जाहीर करण्याची तरतूद या कायद्यात होती.

विधेयकातील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या तरतुदींना काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोध केला होता. पण या विधेयकाच्या बाजुने 147 तर विरोधात फक्त 42 मतं पडली होती.

कोणाला दहशतवादी ठरवणार?

जर एखादी व्यक्ती दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असेल, त्यामध्ये सहभागी असेल, तर त्याला दहशतवादी ठरवलं जाईल. यापूर्वी केवळ संघटनांवर दहशतवादाचा शिक्का मारला जात होता. आता संशयित व्यक्तीवरही मारला जाईल.

संबंधित बातम्या :

Video: मिठी नदीच्या पोटात वाझेनं काय काय लपवलं? बघा NIA ला काय काय सापडलं?

Sachin Waze: मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ अधिकाऱ्याकडे केस गेली अन् घाबरलेल्या सचिन वाझेंनी मनसुखला संपवले

Vinayak Shinde and Naresh Gaur will also be charged under the UAPA Act

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.