Mansukh Hiren | मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, निष्पक्ष चौकशी व्हावी, पत्नी विमल हिरेन यांची प्रतिक्रिया
मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या मात्र, ते असं करु शकणार नाहीत, असं विमल हिरेन म्हणाल्या. Mansukh Hiren Death Case
मुंबई: मनसुख हिरेन यांच्या मृत्यूंनंतर त्यांचे कुटुंबिय प्रथमचं माध्यमासमोर आलं आहे. मी आणि आमचा परिवार असं घडेल याचा विचार करु शकत नाही, असं मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन म्हणाल्या. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी झाली. वेळोवेळी पोलिसांचा फोन येत होता. तेव्हा माझे पती चौकशीसाठी जात होते. त्यांना पूर्ण दिवस बसवून ठेवले जायचे. माझ्या पतींनी या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या मात्र, ते असं करु शकणार नाहीत. गुरुवारी कांदिवली क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांचा फोन आल्यानं ते गेले होते, अशी माहिती मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यानी दिली. (Mansukh Hiren Death Case Vimal Hiren first comment she demanded enquiry of case)
कांदिवली क्राईम ब्रँचमधून फोन आल्याचा दावा
मनसुख हिरेन पोलिसांना तपासात सहकार्य करत होते. गुरुवारी दिवसभर ते पोलीस स्टेशनला गेले होते.पोलिसांना ते तपासात सहकार्य करत होते. कांदिवली क्राईम ब्रँचमधून तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. घोडबंदर येथे बोलवण्यात आलं होतं तिथे गेले होते. तिथे गेल्यानंतर अर्ध्या तासानंतर फोन बंद झाल्याची माहिती विमल हिरेन यांनी दिली. रात्रभर आम्ही वाट बघितली. सकाळपर्यंत ते आले नाहीत. म्हणून आम्ही तक्रार दाखल केली.
जेव्हा जेव्हा पोलिसांचे फोन येत होते तेव्हा ते चौकशीला सहकार्य करत होते. ते आत्महत्या करण्याचा विचार करु शकत नाही. पोलिसांनी याबाबतची अफवा पसरवली आहे. हे चुकीचे आहे. याची चौकशी व्हायला हवी. संपूर्ण कुटुंबाला यामुळे त्रास होत आहे.
निकटवर्तींयाकंडून निष्पक्ष तपासाची मागणी
मनसुख हिरेन यांच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करुन त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी निकटवर्तीयांनी केली आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/JSauUXJBgf
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 5, 2021
संबंधित बातम्या :
Mansukh Hiren : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय : गृहमंत्री अनिल देशमुख
(Mansukh Hiren Death Case Vimal Hiren first comment she demanded enquiry of case)