Mansukh Hiren Death Case | ‘ते’ तावडे कोण?

संपूर्ण कुटुंबाला यामुळे त्रास होत आहे," अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी दिली.(Mansukh Hiren Death Case Who is Police Officer Tawade) 

Mansukh Hiren Death Case | 'ते' तावडे कोण?
Mansukh Hiren Death Case | 'ते' तावडे कोण?
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 11:10 PM

मुंबई : मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. काही वेळापूर्वी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. यावेळी विमल हिरेन यांनी तावडे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख केला. त्यानंतर ‘ते तावडे कोण?’ असा सवाल उपस्थित होत आहे. (Mansukh Hiren Death Case Who is Police Officer Tawade)

मनसुख हिरेन यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

“मी आणि माझे कुटुंब असे होईल याचा कधी विचारही करु शकत नाही. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याबाबत तक्रार केली होती. वेळोवेळी पोलिसांचा फोन येत होता. तेव्हा माझे पती चौकशीसाठी जात होते. त्यांना पूर्ण दिवस बसवून ठेवले जायचे. माझ्या पतींनी या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. त्यांना कालही बोलवण्यात आले. ते काल गेले. पण रात्री घरी परतले नाही. रात्री दहानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवलीवरुन तावडे म्हणून एकाचा फोन आला होता. रात्रभर आम्ही वाट बघितली. सकाळपर्यंत ते आले नाहीत. म्हणून आम्ही तक्रार दाखल केली.”

“जेव्हा जेव्हा पोलिसांचे फोन येत होते तेव्हा ते चौकशीला सहकार्य करत होते. ते आत्महत्या करण्याचा विचार करु शकत नाही. पोलिसांनी याबाबतची अफवा पसरवली आहे. हे चुकीचे आहे. याची चौकशी व्हायला हवी. संपूर्ण कुटुंबाला यामुळे त्रास होत आहे,” अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी दिली.

मनसुख हिरेन यांच्या मोठ्या भावाची प्रतिक्रिया 

मनसुख हिरेन यांची हत्या झाली असावी, असा थेट आरोपी मनसुख हिरेन यांचा सख्खा मोठा भाऊ विनोद हिरेन यांनी केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. मनसुख जेव्हा घरी आला नाही, तेव्हा मी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना रात्री फोन केला. मनसुख हिरेन यांच्या कुटुबाला पोलिस सरंक्षण मिळावं, अशी मागणी विनोद हिरेन यांनी केली आहे.

कांदिवली क्राईम ब्रांचमध्ये तावडे आडनावाचा अधिकारी नाही

दरम्यान याप्रकरणानंतर टीव्ही 9 मराठीने तावडे नावाच्या पोलिसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली. कांदवली क्राईम ब्रांचमध्ये तावडे आडनावाचे कोणीही अधिकारी कार्यरत नाही. मात्र दहिसर क्राईम ब्रांचला युनिट 12 महेश तावडे नावाचे अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. पण क्राईम ब्रांचचे अधिकारी महेश तावडे 1 मार्चपासून सुट्टीवर आहे.

तसेच यानंतर टीव्ही 9 मराठीने महेश तावडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मी मनसुख हिरेन यांना ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणासंदर्भात मला काही माहिती नाही. माझी मनसुख हिरेन यांच्यासोबत बातचीत झाली नाही. मी त्यांना ओळखत नाही, असे महेश तावडे म्हणाले.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला

दरम्यान, मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

उद्योगपती मुकेश अंबानी  यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या गाडीचा शोध पोलिसांनी लावला. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. (Mansukh Hiren Death Case Who is Police Officer Tawade)

संबंधित बातम्या : 

प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…? चित्रा वाघ यांचा सवाल

Mansukh Hiren | मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, निष्पक्ष चौकशी व्हावी, पत्नी विमल हिरेन यांची प्रतिक्रिया

Mansukh Hiren : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय : गृहमंत्री अनिल देशमुख

Who is Mansukh Hiren : मनसुख हिरेन यांची हत्या की आत्महत्या? ते कोण होते? फडणवीस, गृहमंत्री देशमुख आणि मुलगा काय म्हणतो?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.