सर्वात मोठी बातमी | मनोज जरांगे यांच्यावर सर्वात गंभीर आरोप, आंदोलनाआधी आलेला ‘तो’ फोन कोणाचा?

मराठा समाजामध्ये फुट पडलेली दिसत आहे. जरांगे यांच्या जवळचे असलेल्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप करत कोणाचा तरी फोन आल्याचं सांगत गुप्त मीटिंगांबाबत खळबळजवक वक्तव्य केले आहेत. नेमके काय आरोप केलेत जाणून घ्या.

सर्वात मोठी बातमी |  मनोज जरांगे यांच्यावर सर्वात गंभीर आरोप, आंदोलनाआधी आलेला 'तो' फोन कोणाचा?
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 4:37 PM

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाचे शिल्पकार ठरत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्य सरकारने विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा पारित करण्यात आला. आता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र अशातच मराठा समाजामध्ये फुट पडलेली दिसत आहे. जरांगे यांच्या जवळचे असलेल्या अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप करत कोणाचा तरी फोन आल्याचं सांगत गुप्त मीटिंगांबाबत खळबळजवक वक्तव्य केले आहेत.

काय म्हणाले बारसकर महाराज?

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदी साठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे. मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजवायचो. यापूर्वी त्यांनी मी सगळं सांगत असताना महाराज साक्षी आहे ते सांगत होते. मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे. मी प्रसिद्धी साठी किंवा पैशासाठी करतोय मात्र बिलकुल नाही मी कीर्तन कशाचे पैसे घेत नसल्याचं अजय महाराज बारसकर यांनी सांगितलं.

तो फोन कोणाचा?

मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीला उपोषणाला बसण्याआधी एक चर्चा झाली. योगायोगाने मीसुद्धा त्या मीटिंगला हजर होतो, त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी जरांगे यांना आपण आताचा आलोत लगेचच उपोषणाला का सुरूवात करायची? 16 नंतर उपोषणाला बसूयाात त्यावेळी जरांगे यांना फोन आला होता, त्यानंतर जरांगेंनी सांगितलं की मी पत्रकारांना बाईट देऊन आलो की चर्चा करू असं ते बोलले होते. पण त्यांनी पत्रकार परिषद सुरू केल्यावर त्यांनी मी आता उपोषणाला बसलो आहे पुढचं बोला… असं पत्रकारांना म्हणाले, त्यावेळी लोकं म्हणाले आपलं ठरलं नाही उपोषणाला कसे बसता? त्यामुळे त्यांना आलेला फोन कोणाचा हे त्यांनी सांगावं, असं आव्हान बारसकर महाराज यांनी जरांगे यांना दिलं आहे.

जरांगेच्या मागे अदृष्य शक्तींचा हात, भुजबळ असल्याचा संशय, ते याच्यामुळे मोठे झाले. वाशी आणि लोणावळ्यात मी नव्हतो पण बंद खोलीत काय झालं मला ठाऊक आहे. जरांगे वारंवार आपली मागणी बदलत असल्याचा आरोप बारसकर महाराज यांनी केला.

'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.