‘Gunratna Sadavarte ची गाडी फोडणाऱ्यांचा आम्हाला आदर’, कुठल्या नेत्याने असं म्हटलं?

| Updated on: Oct 26, 2023 | 11:09 AM

Maratha Reservation | महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय तापलाय. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलय. या दरम्यान सतत मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची आज तोडफोड करण्यात आली. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलय.

Gunratna Sadavarte ची गाडी फोडणाऱ्यांचा आम्हाला आदर, कुठल्या नेत्याने असं म्हटलं?
Gunaratna Sadavarte
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची आज तोडफोड करण्यात आली. परळ येथील क्रिस्टल टॉवरखाली उभी असलेली गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्यात आली. गाडी फोडणारे एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत होते. गुणरत्न सदावर्ते सतत मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेत आहेत. त्याच रागातून ही तोडफोड झाल्याची शक्यता आहे. क्रिस्टल टॉवरखाली उभी असलेली गुणरत्न सदावर्ते यांची महागडी गाडी फोडण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे काय? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी विचारलाय. मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. झेपणार नाही आणि पेलणार नाही असं मनोज जरांगे म्हणत होते. ते हेच आहे काय? असा सवाल करतानाच मला कोणीच शांत करू शकणार नाही, असा इशाराच गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.

दरम्यान गुणरत्ने सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे नाहीत, असं मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक अमोल जाधवराव यांनी म्हटलय. “भावनेच्या भरात त्यांनी हे कृत्य केलं असेल, तर आम्हाला त्यांच्या भावनेचा आदर आहे. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत” असं, अमोल जाधवराव यांनी म्हटलय. “गुणरत्न सदावर्ते सतत मराठा समाजाविषयी गरळ ओकतात. क्लेशवाचक वक्तव्य का करतात?” असा सवाल अमोल जाधवराव यांनी विचारला.

‘आम्ही त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही’

“गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडणाऱ्या बांधवांचं आम्ही समर्थन करतो. कोणावरही गुन्हा दाखल करण्यात येवू नये. गुणरत्न सदावर्ते हा गरळ ओकण्याच काम करतोय. आम्ही त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्याचा बोलवत धनी कोण आहे आम्हाला माहिती आहे” मराठा समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी फोडाफोडीच समर्थन केलय.