मेडिकलचे मराठा विद्यार्थी आंदोलनावर ठाम
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे आंदोलन आजही आझाद मैदानात सुरुच आहे. “वैद्यकीय प्रवेशाची सात दिवसाची मुदतवाढ देण्याचं राज्य सरकारने दिलेलं आश्वासन फक्त कागदावरच आहे. राज्य सरकारचे नोटिफिकेशन आलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत” असं आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आज वैद्यकीय महाविद्यालय शाखांची निवड करण्याचा शेवटचा दिवस आहे. तीन वाजेपर्यंत पर्याय निवडण्याची वेळ आहे. मात्र […]
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे आंदोलन आजही आझाद मैदानात सुरुच आहे. “वैद्यकीय प्रवेशाची सात दिवसाची मुदतवाढ देण्याचं राज्य सरकारने दिलेलं आश्वासन फक्त कागदावरच आहे. राज्य सरकारचे नोटिफिकेशन आलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत” असं आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
आज वैद्यकीय महाविद्यालय शाखांची निवड करण्याचा शेवटचा दिवस आहे. तीन वाजेपर्यंत पर्याय निवडण्याची वेळ आहे. मात्र राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयानेही वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात यंदा मराठा आरक्षण लागू करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे. 9 मे रोजी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. याआधी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षण यंदापासून लागू करण्यास नकार दिला होता. तोच निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. मात्र वर्ष वाया जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तोडग्याची मागणी केली आहे.
वाचा – पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी यंदा मराठा आरक्षण नाहीच : सुप्रीम कोर्ट
अन्य विद्यार्थी विरोधी आंदोलन करणार
दरम्यान मराठा मोर्चाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी मेडिकलचे इतर 2000 विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. ही सर्व मुले खुल्या गटातील असल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी हे विद्यार्थी जमणार आहेत.
गिरीश महाजन विद्यार्थ्यांच्या भेटीला
वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाद्वारे प्रवेश द्यावा, अशी मागणी करत गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
“मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पॉझिटिव्ह आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना 100 टक्के न्याय देणार आहोत. मात्र, कायदेशीर बाबींची तपसाणी सुरु आहे. कायदेतज्ञांच्या मार्गदर्शनाने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.”, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना दिले.
लेखी आश्वासनावर विद्यार्थी ठाम
दरम्यान, “जोपर्यंत जोवर ठोस आणि लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर इथून एकही विद्यार्थी उठणार नाही. आंदोलन थांबणार नाही.”, असे म्हणत मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी महाजन यांच्या आश्वासनानंतरही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयानाचा निकाल
सर्वोच्च न्यायालयानेही वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात यंदा मराठा आरक्षण लागू करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे. 9 मे रोजी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. याआधी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षण यंदापासून लागू करण्यास नकार दिला होता. तोच निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला.
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची आव्हान याचिका फेटाळली. शिवाय कोर्टाने सर्व प्रवेश प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश दिले. आतापर्यंत मराठा अरक्षणाअंतर्गत झालेले प्रवेश शेवटी जागा उरल्यास त्या जागांवर सामावून घ्यावे, असं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं.
हायकोर्टाचा निर्णय काय होता?
यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला. पुढील वर्षापासून मराठा आरक्षण लागू करण्यात येणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमास लागू केलेले मराठा आरक्षण अवैध आहे, असा दावा खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी केला होता.
संबंधित बातम्या
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी यंदा मराठा आरक्षण नाहीच : सुप्रीम कोर्ट
मुख्यमंत्र्यांशी चर्चा, महाजन आझाद मैदानात, तरीही मराठा आंदोलक ठाम
मेडिकलसाठी आरक्षण का नाही? मराठा समाज पुन्हा आक्रमक
आरक्षणापासून वंचित मेडिकलच्या विद्यार्थ्यांना न्याय देणारच : चंद्रकांत पाटील