मराठी राजभाषा दिन 2021: ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. | Marathi Rajbhasha Din

मराठी राजभाषा दिन 2021:  'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी', राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 8:43 AM

मुंबई : ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोज केलं गेलं आहे. (Marathi Rajbhasha Din 2021 Kusumagraj Birth Anniversary Marathi Language Day)

मराठी भाषा गौरवदिनी पुस्तकांचं प्रकाशन

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. यावर्षी कोरोनासारख्या महासंकटातदेखील सदर परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 14 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हे विषय तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये उत्तमोत्तम ग्रंथ रचना करणे हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि आधुनिक महाराष्ट्राच्या वाङमयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङमयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करेन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून  पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी ही केवळ मातृभाषाच नसून ती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपण हा दिवस स्वाभिमानाने बघू शकत आहोत. त्यामुळे मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जाच नव्हे तर सर्वोच्च भाषा म्हणून मान्यता मिळाली  पाहिजे, असं ते म्हणाले.

मराठी भाषेला गौरवशाली संस्कृती आहे. याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. त्याचबरोबर शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याची, सोप्या भाषेतील शब्दकोश तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आवश्यक असणारे सर्व पुरावे केंद्राला सादर केले असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

(Marathi Rajbhasha Din 2021 Kusumagraj Birth Anniversary Marathi Language Day)

हे ही वाचा :

मराठी भाषा दिन विशेष : नाशिकमधील मराठी साहित्याचं चालतं-बोलतं विद्यापीठ, कोण आहेत वाय. पी. कुलकर्णी?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.